Cotton Cultivation : कापूस उत्पादन वाढीसाठी सघन कापूस लागवडीचा ‘अकोला पॅटर्न’

Team Agrowon

कापसाची उत्पादकता वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या सघन कापूस लागवडीचा ‘अकोला’ पॅटर्न तयार होत आहे.

Cotton Cultivation | Agrowon

येत्या हंगामात अकोला जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर या पद्धतीने कापूस लागवड करून उत्पादकता वाढीसाठी ठोस प्रयत्न केले जाणार आहेत.

Cotton Cultivation | Agrowon

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश देत नियोजन करण्याचे व आवश्‍यक निधी देण्याचे आश्‍वासनही दिले आहे.

Cotton Cultivation | Agrowon

अकोला जिल्ह्यात सघन पद्धतीने कापूस लागवडीचा प्रयोग मागील सात ते आठ वर्षांपासून दिलीप ठाकरे यांनी सुरू केला. त्यांची एकरी उत्पादकता १५ क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त मिळत आलेली आहे.

Cotton Cultivation | Agrowon

या सघन पद्धतीने कापूस लागवडीला मागील हंगामापासून शासनाकडून प्रोत्साहनही दिले जात आहे. मागील वर्षात प्रकल्पातून ५३८ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सुमारे १५२८ हेक्टरवर ही सघन लागवड पोहोचली आहे.

Cotton Cultivation | Agrowon

सन २०२५च्या हंगामात सघन पद्धतीने जिल्ह्यात हजारो हेक्टरवर कापूस लागवडीचे उद्दिष्ट नियोजित करण्यात आले आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरला तर त्याचा संपूर्ण देशभरात विस्तार केला जाणार आहे.

Cotton Cultivation | Agrowon

सघन लागवड पद्धतीने देशातील कापसाचे उत्पन्न दुप्पट होऊन आपण इतर प्रगत देशांच्या उत्पादकतेत जवळपास पोहचू शकतो. त्यासाठी या पद्धतीचा प्रचार-प्रसार आणि प्रसिद्धीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

Cotton Cultivation | Agrowon

Snails Outbreak : यंदाही शंखी गोगलगाय धुमाकूळ घालणार का?

आणखी पाहा...