Agriculture Training
Agriculture TrainingAgrowon

Agriculture Training : शेतकऱ्यांनी घेतले एकात्मिक कापूस लागवड व्यवस्थापनाचे धडे

KVK Jalna Training Program : कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी जालना येथे एकात्मिक कापूस लागवड व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
Published on

Jalna News : केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. २७) कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी जालना येथे एकात्मिक कापूस लागवड व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. एस. व्ही. सोनुने, कीटकशास्त्रज्ञ प्रा.अजय मिटकरी, मृद शास्त्रज्ञ राहुल चौधरी, कृषी अभियंता पंडित वासरे, नुजीविडू सीडचे विभागीय व्यवस्थापक एस.पी.पवार, प्रभात सीडचे जिल्हा व्यवस्थापक रवींद्र तायडे, नुजीविडू सीडचे जिल्हा व्यवस्थापक सचिन अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Agriculture Training
Agriculture Training : कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती प्रशिक्षण

यावेळी एस. पी. पवार यांनी कापसातील वाढरोधकाचा वापर या विषयी मार्गदर्शन केले. प्रा. अजय मिटकरी यांनी कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. तर प्रा. राहुल चौधरी यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच पंडित वासरे यांनी पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

Agriculture Training
Agriculture Training : केव्हीकेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण

सर्व प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांनी कापूस पिकात प्रत्यक्ष फळ फांदी व वाढ फांदीची ओळख करून देण्यात आली व वाढ फांदी काढण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खूप वाढणारा कापूस फायद्याचा नाही. एकात्मिक कापूस लागवड व्यवस्थापनातून कापसाचे शाश्वत उत्पादन घेणे शक्य आहे कमी अंतरावर कापूस लागवड करून एकरी १० हजार पेक्षा जास्त झाडांची संख्या ठेवल्यास कापसाचे उत्पन्न वाढणे शक्य. कापूस पिकला शिफारशीप्रमाणे खतांचा वापर केल्यास व योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास कापसाचे शाश्वत उत्पादन घेता येईल.
डॉ. एस. व्ही. सोनुने, प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र खरपुडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com