Latur River Barrages  Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Monsoon Rain : दहा दिवसांच्या पावसाने बॅरेज काठोकाठ

Latur River Overflow : जिल्ह्यात तीनही नद्यांवर मिळून २७ उच्चस्तरीय बंधारे आहेत. त्यात मांजरा नदीवर १४, तावरजा नदीवर एक, तेरणा नदीवर नऊ तर रेणा नदीवर तीन आहेत.

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे लहानमोठ्या नद्यांना पाणी आले आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या तीनही नद्यांवरील उच्चस्तरीय बंधाऱ्यांमध्ये (बॅरेजेस) मुबलक पाणीसाठा आला आहे. नदीपात्रात पाण्याची आवक सुरूच असल्याने सर्व बंधाऱ्यांचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तीनही नद्या पावसाळ्यापूर्वीच दुथडी भरु वाहत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात तीनही नद्यांवर मिळून २७ उच्चस्तरीय बंधारे आहेत. त्यात मांजरा नदीवर १४, तावरजा नदीवर एक, तेरणा नदीवर नऊ तर रेणा नदीवर तीन आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून हे बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे तीनही नद्यांच्या पात्रात वर्षभर पाणी राहत आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलैमध्ये बंधाऱ्यात पाणी येण्यास सुरुवात होते. यंदा मात्र अवेळी पावसाने सलग दहा दिवसांपासून लावलेल्या हजेरीमुळे बंधाऱ्यांत पाणीसाठा झाला आहे. नदीपात्रातील पाण्याची आवक लक्षात घेता आतापर्यंत १७ बंधारे शंभर टक्के भरू शकतात. मात्र पूर्ण संचय पातळीत पाणीसाठा न करता बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागतो.

काही दिवसांपासून विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील शेवटच्या धनेगाव (ता. देवणी) बंधाऱ्यातही मुबलक पाणी आले आहे. यात तेरणा नदीवरील सात बंधाऱ्यात मुबलक पाणी आले असून, सर्व बंधाऱ्यात मिळून ४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. यासातही बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

बॅरेजेसमध्ये ४१ टक्के पाणीसाठा

मांजरा नदीवरील साई, नागझरी, शिवणी, बिंदगीहाळ, खुलगापूर, डोंगरगाव, धनेगाव, तावरजा नदीवरील भुसणी, तेरणा नदीवरील राजेगाव, किल्लारी, मदनसुरी, लिंबाळा गुंजरगा, तगरखेडा, औराद शहाजानी तर रेणा नदीवरील रेणापूर व खरोळा बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक पाहून बंधाऱ्यात पाणीसाठा केला जात असून आवक वाढताच बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार सर्व २७ बंधाऱ्यांची मिळून एकूण साठवण क्षमता ७७.७२० दशलक्ष घनमीटर आहे. त्या तुलनेत सध्या वीस बंधाऱ्यात ३१.८६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. एकूण साठवण क्षमतेच्या हा साठा ४१ टक्के आहे. तर सध्या १५ बंधाऱ्यांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

DA Hike : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढला पगार?

Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा 

Crop Loss: कापणीच्या मुहूर्तावर अस्मानी संकट

Jayakwadi Dam: जायकवाडीतून गोदापात्रातील विसर्गात घट 

Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT