
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पूर्वमोसमी पाऊस कोसळत आहे. दोन दिवसांपासून अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी (ता. २४) पहाटेपासूनच संततधार पाऊस अनेक भागांत सुरू आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील तब्बल ६० महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस पडत आहे. मात्र चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सर्वाधिक फटका आंबा उत्पादकांना बसला आहे.
याशिवाय उन्हाळी बाजरी, आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल सहायकांच्या आंदोलनामुळे नेमके नुकसान किती झाले याचा आकडा कृषी विभागाकडे उपलब्ध होत नाही. परंतु प्राथमिक अंदाजानुसार एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या २४ तासांमध्ये ही अनेक महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाला. प्रशासनाकडे नोंदणी नुसार ६० पेक्षा अधिक महसूल मंडळांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. सतत दार पावसामुळे तसेच जोरदार पावसामुळे, तसेच वाफसा नसल्याने अनेक भागांमध्ये खरीपपूर्व कामे खोळंबली आहेत. यंदा पेरण्या कापूस लागवड लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चोवीस तासांत झालेला पाऊस
सावेडी : २४, कापूरवाडी : १९, केडगाव: १४, भिंगार : ३६, चिचोंडी : २०, वाळकी: १९, चास : १८, रुईछत्तीशी : १६, नेप्ती : १८, पारनेर : १८, भाळवणी : २१, पळवे : १९, श्रीगोंदा : १८ काष्टी : २२ मांडवगण : १९ बेलवंडी : २२, पेंडगाव : २४, चिंभळा : २३ देवदैठण: १९, लोणी व्यंकनाथ : १८, राशीन : २४, कोंभळी : २२, खेड : ३४, जामखेड : ५०, खर्डा : १८, बोधेगाव : २८ पाथर्डी : २४ माणिकदौंडी : २४ टाकळी ३८ कोरडगाव : २६ खरवंडी : ३८ अकोला : २६.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.