Rain Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage : ‘मॉन्सूनपूर्व’ने बाराशे एकरांतील पिकांचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : अचानक आलेल्या या पावसामुळे अंदाजे १२०० एकर क्षेत्रावरील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः उन्हाळी ज्वारी, कांदा, फळपिके व भाजीपाला यांसारख्या पिकांना पावसाचा फटका बसला आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून मॉन्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे अंदाजे १२०० एकर क्षेत्रावरील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः उन्हाळी ज्वारी, कांदा, फळपिके व भाजीपाला यांसारख्या पिकांना पावसाचा फटका बसला आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील नायगाव, मुखेड, किनवट, देगलूर, हदगाव आणि भोकर तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवला. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे व विजांच्या तारा तुटल्याच्या घटना घडल्या होत्या. केवळ शेतीचेच नव्हे तर ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळित झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांनी नुकसानीच्या ठिकाणी भेटी देणे सुरू केले आहे.

तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहायक यांच्या माध्यमातून पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असून, जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना धीर देत लवकरच मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. विविध पिकांना पावसाचा फटका बसला असून, सर्व तालुक्यांतून अहवाल मागविण्यात आले आहेत.

हे अहवाल राज्य शासनाला प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. दरम्यान, पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, कृषी विभाग शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करत आहे.

नुकसानीमुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून, तत्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटाच्या खाईत सापडला आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

फळपिकांना बसला सर्वाधिक फटका

सध्या विविध फळांच्या बागा तोडणीसाठी आलेल्या असून वारे व पावसामुळे आंबा, केळी यासह अन्य फळपिकांना फटका बसला आहे. याशिवाय भाजीपाल्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागासह तहसीलदारांना दिले आहेत. जिल्ह्यात महसूल व कृषी विभागामार्फत पिकांचे पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, तीनशे हेक्टर नुकसान असले, तरी पंचनामे झाल्यानंतर किती नुकसान आहे, त्याचा आकडा समोर येईल.
- दत्तकुमार कळसाईत, जिल्हा कृषी अधीक्षक, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT