Rain Crop Damage
Rain Crop DamageAgrowon

Rain Crop Damage : नागपूर जिल्ह्यात १२८ हेक्टरवर नुकसान

Heavy Rain Crop Loss : जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त प्राथमिक अहवालानुसार या अवकाळी पाऊस, गारपिटीचा सर्वाधिक फटका भिवापूर, मौदा, हिंगणा, सावनेर या तालुक्यांना बसला.
Published on

Nagpur News : जिल्ह्यात १ ते ३१ मे या कालावधीत झालेल्या मॉन्सूनपूर्व पाऊस, गारपीट व वीज कोसळल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू, ४३ वर पशूंची हानी झाली, तर सहाशेच्या वर घरांचे नुकसान झाले असून, १२८ हेक्टरवरील शेतीपिकांनाही याचा फटका बसल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पाऊस, गारपीट व वीज कोसळल्यामुळे ग्रामीण जनतेला चांगलेच हादरवून सोडले. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त प्राथमिक अहवालानुसार या अवकाळी पाऊस, गारपिटीचा सर्वाधिक फटका भिवापूर, मौदा, हिंगणा, सावनेर या तालुक्यांना बसला. काटोल, रामटेक आणि कुहीत प्रत्येकी एक तर हिंगण्यात वीज कोसळून दोघांचा अशा पाच व्यक्तींचा मृत्यू झाला.

Rain Crop Damage
Rain Crop Damage: मॉन्सूनपूर्व पावसामुळे १९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

५५ नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ३० मोठी आणि १४ लहान अशा ४४ जनावरांसह १३५ गोठ्यांचेही नुकसान झाले. २४५ शेतकऱ्यांच्या १२८.४ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये भाजीपाला पिकांसह विविध पिकांचा समावेश आहे.

Rain Crop Damage
Crop Damage Survey: आमदारांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी

अहवालानुसार, रामटेक, कळमेश्‍वर, कामठी, नरखेड आणि नागपूर (ग्रा.) या तालुक्यांत कमी नुकसान झाले असले, तरी नैसर्गिक आपत्तीने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. शेतकऱ्यांनी पंचनामे करून योग्य भरपाई देण्याची मागणी केली आहे.

जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचनाम्यांची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

मे महिन्यामध्ये जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीसंदर्भात प्राथमिक अहवालानुसार पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १२८ हेक्टरवरील शेतीपिकांच्या नुकसानीसह सहाशेवर लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. सोबतच पशुहानीही झाली आहे. त्यानुसार पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून, अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार नुकसान भरपाईसंदर्भात मागणी करण्यात येईल.
- अनुप खांडे, निवासी उपजिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com