Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Monsoon Rain : वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा जोर कायम

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी (ता. ११) सायंकाळपासून रविवारी (ता. १२) दुपारपर्यंत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा जोर कायम होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विहामांडवा येथे पावसाने हजेरी लावली. पीरबावडा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आळंद परिसरात ढगांच्या गडगडासह माध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला. ढोरकीन येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. लोहगाव येथे विजांचा कडकडाट रिमझिम पाऊस झाला.

जायकवाडीसह परिसरात रात्री वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) येथे शनिवारी रात्री ११ दरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसाने उन्हाळी बाजरी, कांदा बिजवाई, टोमॅटो आदींचे नुकसान झाले. पीरबावडा (ता. फुलंब्री) येथे रविवारी सकाळपर्यंत १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वादळाने घरावरील पत्रे उडाले.

माणिकनगर परिसरात रविवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण व भुरभुर पावसास सुरुवात झाली होती. हतनूर परिसरात सलग तीन दिवसांपासून अधूनमधून भुरभुर पाऊस होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे रविवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. जवळपास दीड तास पाऊस सुरू होता.

उमरगा परिसरात रविवारी दुपारी १२ नंतर पाऊस झाला. रविवारीच दुपारी ३ च्या दरम्यान जेवळी व परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत होता. तर माडज, परिसरात, पाऊस, वादळी वारे सुरू होते. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात रविवारी दुपारी साडेबारानंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला होता.

जालना जिल्ह्यात जाफराबाद शहरासह तालुक्यात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास विजांचा कडकडाट, वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकरी, नागरिकांची ताराबंळ उडाली. रविवारी (ता. १२) सकाळी सहा वाजता आकाशात विजा चमकू लागल्या, विजांचा कडकडाट, वादळी वारे, त्यानंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली. वादळी वाऱ्यांमुळे तहसील कार्यालय परिसरातील झाड उन्मळून पडले. तर काही गावांत वीजपुरवठा खंडित झाला होता.

तालुक्यात ब्रह्मपुरी, सावंगी, गोंधनखेडा, देऊळझरी, वरुड बु., हिवराबळी, सिपोरा अंभोरा, नळविहीरा, निमखेडा बु., हनुमंत खेडा, मेरखेडा, कोळेगाव, देऊळगांव उगले, पिंपळखुटा, विरखेडा भालकी, कुंभारी, खासगाव, खामखेडा, आळंद, बोरखेडी चिंच, हिवराकाबळी, आरतखेडा, सावखेडा, टाकळी, वरखेडा विरो, गारखेडा, डावरगाव, भातोडी यासह अन्य ठिकाणी पडलेल्या पावसामुळे उन्हाळी मका, बाजरी, आंब्याचे नुकसान झाले. तसेच जनावरांसाठी असलेला चारा भुस्सा भिजल्याने नुकसान झाले आहे.

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, जवखेडा ठोंबरी, तडेगाव येथे मध्यम स्वरूपात पाऊस झाला. तर खापरखेडा, निमखेडा, आंबेगाव नळणी गावात मॉन्सूसपूर्व पावसामुळे शेतीतून पाणी वाहिल्याने नाल्यांना पाणी आले. शेती मशागतीसाठी पाऊस चांगला असला तरी, रब्बीतील पीक काढणीसाठी आलेल्या पिकात कांदा, मका, शाळू, बाजरी आदी पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. रविवारी सकाळी विजांसह पावसाला सुरुवात झाली. मिरचीसाठी पाऊस समाधानकारक मानला जात आहे.

वादळाचा शेडनेटला तडाखा

परतूर : अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने परतूर तालुक्यातील सिरसगाव येथील शेतकऱ्यांचे वीस गुंठ्यातील शेडनेट उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. परतूर तालुक्यात शनिवारी (ता. ११) रात्री ११च्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. त्याचबरोबर वादळी वाऱ्याला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.

वाऱ्यामुळे अनेक जणांच्या घराचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली. सिरसगाव येथील शेतकरी अनिल इंदरराव जाधव यांनी तीन महिन्यांपूर्वी वीस गुंठ्यांत केलेले शेडनेट पूर्ण उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. यात सिमला मिरचीची लागवड केलेली होती. झालेल्या नुकसानीची पाहणी माजी मंत्री बबनराव लोणीकर, युवमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT