Amravati News: अचलपूर तालुका कृषी कार्यालयात विविध पदे रिक्त असल्याने शासनाच्या कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना प्रशासनाला अडचणी येत आहेत. .एका कृषी सहाय्यकाकडे तब्बल १० ते १३ गावांचा (मौजांचा) कारभार असल्याने अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांची कामे रखडत असून गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे..साधारणतः एका मंडळात दोन उपकृषी अधिकारी व सहा ते बारा कृषी अधिकारी अपेक्षित असतात. मात्र अचलपूर तालुक्यात उपकृषी अधिकारी पाच मंजूर पदांपैकी केवळ तीन कार्यरत आहेत. .त्यापैकी एक अधिकारी अमरावती जिल्हा अधीक्षक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असून, दुसऱ्याकडे गुणनियंत्रण अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार आहे. परिणामी प्रत्यक्षात केवळ एकच उपकृषी अधिकारी संपूर्ण कारभार पाहत आहे. .Agriculture Officers: कृषी कर्मचाऱ्यांसाठी लॅपटॉप ठरले लबाडाचे आवतन.तसेच सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकाऱ्यांवर १० ते १२ गावांचा अतिरिक्त भार पडला आहे..Agricultural Officers Issue : सहायक कृषी अधिकारी संघटनेचा सिम कार्ड स्वीकारण्यास नकार.Agriculture Officeत्यामुळे शेतकऱ्यांचे प्रस्ताव, अनुदान, पीकविमा, योजनांचे अर्ज व मार्गदर्शन यामध्ये विलंब होत आहे. यामुळे शासनाच्या कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे चित्र आहे..तालुका कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.