Pune News: राज्यातील थंडीची लाट ओसरली असली, तरी गारठा कायम आहे. पहाटेच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. आज (ता. १९) राज्यातील गारठा कायम राहणार असून, उद्यापासून (ता. २०) राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..उत्तर भारतात थंडी कमी - अधिक होत असून, बुधवारी (ता. १७) मध्य प्रदेशातील इंदर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.५ अंश किमान तापमानाची तर सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी ३६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Cold Wave: राज्यातील थंडी काही दिवस टिकून राहण्याची शक्यता.गुरुवारी (ता. १८) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.४ अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात ६.५ अंश सेल्सिअस तर जेऊर येथे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच गोंदिया, अहिल्यानगर येथे ९ अंशांपेक्षा कमी, मालेगाव, यवतमाळ, नाशिक, भंडारा, नागपूर येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली..किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. गुरुवारी (ता. १८) परभणी, निफाड, धुळे, आणि जेऊर येथे थंडीच्या लाटेसदृश स्थिती होती. उर्वरित राज्यात थंडी काहीशी ओसरली आहे. आज (ता. १९) राज्यात गारठा कायम राहणार असून, किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..Cold Wave: थंडीचा कडाका काही भागात वाढला; राज्यातील थंडी काही दिवस टिकून राहण्याची शक्यता.राज्यात थंडी असलेली ठिकाणेपरभणी (कृषी) ६.२, निफाड ६.४, धुळे ६.५, जेऊर ७.सरासरी तापमान (अंश से.)विभाग किमान कमालउत्तर महाराष्ट्र ६.४ ३०.०पश्चिम महाराष्ट्र ७.० ३३.२मराठवाडा ६.२ ३०.८विदर्भ ८.४ ३२.०कोकण १६.६ ३४.३.गुरुवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :शहर कमाल किमानपुणे २९.८ १०.४अहिल्यानगर ३०.० ८.५धुळे २९.० ६.५जळगाव २९.९ १०.३जेऊर ३१.५ ७.०कोल्हापूर २९.३ १५.५महाबळेश्वर २७.९ १३.२मालेगाव २७.० ९.६नाशिक २९.३ ९.८.Cold Wave: लातुरात वाढला थंडीचा कडाका; तापमान ११ अंशावर.निफाड २९.२ ६.४सांगली ३०.९ १४.२सातारा ३१.५ ११.७सोलापूर ३३.२ १३.७सांताक्रूझ ३३.८ १७.४डहाणू ३३.४ १५.९रत्नागिरी ३४.९ १८.१.छत्रपती संभाजीनगर ३०.३ ११.२धाराशिव ३०.८ १२.०परभणी ३०.१ १०.८परभणी (कृषी) २८.५ ६.२अकोला ३१.५ १०.९अमरावती ३२.० ११.०भंडारा ३०.० १०.०.बुलडाणा ३१.५ १३.०ब्रह्मपुरी ३०.२ १२.०चंद्रपूर ३०.४ १२.०गडचिरोली २९.६ ११.६गोंदिया २८.८ ८.४नागपूर ३०.२ १०.०वर्धा ३१.० ११.०वाशीम ३१.० ११.२यवतमाळ ३०.४ ९.६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.