Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : मॉन्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीला कात्री

Pre-Monsoon Crop Loss : या वर्षी मे महिन्यात जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला होता. यात ६०५ गावांना फटका बसून सात हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Akola News : या वर्षी मे महिन्यात जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला होता. यात ६०५ गावांना फटका बसून सात हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्तांसाठी २० कोटी ९३ लाख १० हजार १२० रुपयांच्या मदत निधीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात शासनाकडे दिला होता.

या प्रस्तावानुसार शासनाकडून १३ कोटी १७ लाख आठ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मात्र हा निधी पाहता कात्री लावण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जिल्ह्यात दोन व तीन एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पावसाने अकोट व तेल्हारा तालुक्यांतील ८८६ हेक्टरवर टरबूज व मूग पिकांचे नुकसान केले होते.

त्यानंतर कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाकडून झालेल्या संयुक्त सर्व्हेक्षणानुसार २ कोटी ३९ लाख ३२ हजार २६० रुपये मदतीचा अंतिम प्रस्ताव २९ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा प्रशासनाने सादर केला. त्यासोबतच मे महिन्यात तीन वेळा पाऊस झाला होता.

मे महिन्यात सातही तालुक्यांतील ६०५ गावांतील ७ हजार ५९३ हेक्टरवर पिकांना फटका बसल्याचा उल्लेख संयुक्त सर्व्हेक्षणात करण्यात आला होता. या नुकसानीपोटी २० कोटी ९३ लाख १० हजार १२० रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे २७ जून रोजी केली होती. मात्र त्याला सुमारे सात कोटींहून अधिक रुपयांची कात्री लावल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

जुन्या शासन निर्यानुसार निधी मंजूर

जुन्या शासन निर्णयानुसार हा मदतनिधी मंजूर करण्यात आला आहे. २०२३ च्या शासन निर्णयानुसार, बागायती पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरपर्यंतचे नुकसान बघता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १७ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसानीसाठी २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर दराने मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

Farmer Safety: विविध दंश, विषबाधेपासून स्वसंरक्षणाच्या उपाययोजना

Maharashtra’s Grape Industry: जागतिक ‘व्हिजन’ ठेवून द्राक्ष उद्योगाची वाटचाल

Weekly Weather: राज्यात चांगल्या पावसाची शक्यता

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

SCROLL FOR NEXT