Maharashtra Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Staffing : कृषी विभागात प्रभारीराज

Shortage of full-time officers : शेतकऱ्यांच्या विकासाचा बिंदू असलेल्या कृषी विभागात अनेक प्रमुख पदांवर पूर्णवेळ अधिकारी नाहीत.

Team Agrowon

Jalgaon News : शेतकऱ्यांच्या विकासाचा बिंदू असलेल्या कृषी विभागात अनेक प्रमुख पदांवर पूर्णवेळ अधिकारी नाहीत. यामुळे कृषी विकासाला खिळ बसत असून, कामकाजावर परिणाम झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी तंत्र अधिकारी, ममुराबाद येथील माती व पाणी परीक्षण, जैविक प्रयोगशाळेतील तंत्र अधिकारी ही प्रमुख पदे रिक्त आहेत. प्रभारी अधिकारी कार्यरत असून, कामे रेंगाळत आहेत.

कृषी सहायकांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. तीन्ही उपविभागीय अधिकारी पदेही रिक्त आहेत. जळगाव, अमळनेर व पाचोरा येथील पदांचा त्यात समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपद तब्बल नऊ महिने रिक्त आहे. मध्यंतरी आत्माचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांच्याकडे प्रभार होता. त्यांनी हा पदभार सोडला. सध्या चंद्रकांत पाटील हे या पदावर प्रभारी म्हणून कार्यरत आहेत.

जळगाव तालुका कृषी अधिकारीपदही रिक्त असून, सध्या या पदावर प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. या विभागात कृषीऐवजी अन्य कामांत कर्मचाऱ्यांना गुंतवून ठेवले जात असल्याची कुजबूजही सुरू असून, प्रभारीराजचा फटका कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही बसत आहे. धोरणत्मक निर्णय प्रभारी अधिकारी घेत नाहीत.

त्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी, सूक्ष्मसिंचन अनुदान व इतर योजनांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याची स्थिती आहे. यातच काही अधिकारी जिल्ह्यात नियुक्तीसाठी इच्छुक आहेत. परंतु त्यांची नियुक्ती मंत्रालय स्तरावरून रखडली आहे. त्यांचे बदली आदेश, प्रस्ताव धूळखात पडले आहेत, अशी माहिती मिळाली.

शासन कमी पडतेय

जिल्ह्यात राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणारे दोन वरिष्ठ मंत्री आहेत. परंतु कृषी विभागात अनेक महिने मुख्य पदे रिक्त कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जे महत्त्व महसुली, जिल्हा परिषद या यंत्रणांना दिले जाते, तेच महत्त्व कृषी विभागास दिले जात नसल्याची कुरबूर आहे. कुणी लक्ष देत नसल्याने कृषी विभागातील पदे रिक्त राहत आहेत, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

कणाच वाकलेला...

कृषी विभागाचा कणा म्हणून कृषी सहायकांचा उल्लेख केला जातो. परंतु एका कृषी सहायकाकडे चार ते पाच गावांचे काम आहे. अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ, वादळ यासंबंधीचे वस्तुस्थितीदर्शक पंचनामे होण्यासाठी गावोगावी कृषी सहायक असणे आवश्यक आहे. परंतु ही पदे रिक्त असल्याने पंचनामे रखडतात शिवाय १०० पेक्षा अधिक योजनाही शेतकऱ्यापर्यंत गतीने पोहोचत नाहीत, अशी स्थिती जिल्ह्यात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer shortage : देशात खताचा साठा पुरेसा, केंद्र सरकारचा दावा; शेतकऱ्यांची मात्र खत टंचाईने कोंडी

Fruit Packaging: भारतीय फळनिहाय पॅकेजिंग पद्धती

Agriculture Minister: विद्यार्थी वसतिगृहाला कृषिमंत्र्याची अचानक भेट

Agriculture Land Document: महसूल, दिवाणी कोर्टासाठी फेरफार पत्रक

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

SCROLL FOR NEXT