Dr. Praveen Gedam Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Praveen Gedam : शेती क्षेत्रात परिवर्तनाची तरुण शेतकऱ्यांमध्ये ताकद

Agriculture News : तरुणांनी शेतीकडे उद्योग-व्यवसाय म्हणून पाहिल्यास शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद असल्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी (ता. १) येथे सांगितले.

Team Agrowon

Jalgaon News : शेतकऱ्यांनी शेतीत कृषी संलग्न व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करावा. तरुणांनी शेतीकडे उद्योग-व्यवसाय म्हणून पाहिल्यास शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद असल्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी (ता. १) येथे सांगितले.

जळगाव तालुक्यातील सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या प्रक्षेत्रांना श्री. गेडाम यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. सावखेडा खुर्द शिवारातील सुशिलाबाई आत्माराम साळुंखे यांच्या शेतातील निर्यातक्षम केळी उत्पादन, त्यांनी बी. आय. (बड इंजेक्शन) तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन केलेल्या केळी पीक प्रक्षेत्रास भेट देऊन तांत्रिक व कमी खर्चाचे तंत्रज्ञान याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली.

तसेच श्री. गेडाम यांनी मौजे करंज शिवारातील धोंडीराम सपकाळे यांनी लागवड केलेल्या नवीन कांदे बाग प्रक्षेत्रास टिश्यू कल्चर तंत्रज्ञान व पारंपारिक कंद लागवड याच्या उत्पन्नातील फरक, वेळेची बचत आदी बाबत चर्चा केली. मौजे कानळदा कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेंतर्गत आशाताई अशोक राणे यांनी खरेदी केलेल्या हार्वेस्टर या यंत्राची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

याचठिकाणी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत गोपाल सपकाळे यांनी उभारलेल्या सदगुरु केळी प्रक्रिया उद्योगाची पाहणी केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील,

कृषी विज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी, तंत्र अधिकारी दीपक ठाकूर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे, मंडल कृषी अधिकारी अमित भामरे, कृषी पर्यवेक्षक डी. डी. सोनवणे, योगेश अत्रे, राहुल साळुंखे, प्रवीण सोनवणे, भरत पाटील, कमलेश पवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सोनू कापसे, विवेक चव्हाण आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan Defaulter: साडेतीन लाख शेतकरी पीककर्ज थकबाकीदार

Pune Land Violation: पुणे जिल्ह्यात वर्ग-२ जमिनींच्या ३४३ प्रकरणांत शर्तभंग

Agriculture Commissioner: शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी एकजुटीने प्रयत्न हवेत: कृषी आयुक्त सूरज मांढरे

Sugarcane Season: ऐंशी कारखान्यांनी संपवला हंगाम

Banana Price: खानदेशात केळी दरात सुधारणा

SCROLL FOR NEXT