Kolhapur News: यंदाच्या हंगामात देशातील साखर उत्पादनाने वेग पकडला असला तरी कारखाने बंद होण्याचे प्रमाणही वेगात आहे. १४ फेब्रुवारी अखेर देशातील ८० कारखान्यांनी आपला साखर हंगाम समाप्त केला आहे. ५३२ पैकी ४५४ कारखाने या कालावधीअखेर सुरू आहेत. विशेष करून महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने येत्या पंधरा दिवसांत गतीने बंद होतील, अशी शक्यता आहे..राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील साखर उत्पादनाने २२५ लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १९७ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा यंदा २८ लाख टनाने साखरेचे उत्पादन जास्त झाले आहे. बहुतांशी ऊस पट्ट्यामध्ये हंगाम सुरू झाल्यापासून कुठेच पाऊस झाला नाही..Sugar Industry: आर्थिक आरोग्याची त्रिसूत्री.यामुळे हंगाम विना अडथळा सुरू राहिला. गाळपास गती आल्याने हंगामाची समाप्ती ही वेगाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्षेत्र काहीसे वाढले असले तरी महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये अति पावसाने व प्रतिकूल हवामानामुळे उसाची वाढ कमी झाली यामुळे एकरी उत्पादन घटले आहे. अनेक ठिकाणी तुरे आल्याने उसाच्या वजनात मोठी घट झाली. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन घटण्यावर झाला..Sangli Sugar Production: सांगलीत साखर उत्पादन महिनाअखेरीस होणार बंद.महाराष्ट्रात यंदा तब्बल वीस लाख टन अतिरिक्त साखर तयारउत्तर प्रदेश ६६ लाख टन साखर तयार करून दुसऱ्या क्रमांकावरमहाराष्ट्र व उत्तर प्रदेशातला फरक तब्बल २४ लाख टनउत्तर प्रदेशात गेल्या वर्षीपेक्षा यंदा तीन लाख टन जादा साखर तयारकर्नाटकात ४२ लाख टन साखरेची निर्मितीगेल्या वर्षी याच कालावधीत कर्नाटकात ३७ लाख टन.साखर तयार महाराष्ट्राची आघाडीदेशाच्या एकूण साखरेच्या उत्पन्नांपैकी ८७ टक्के उत्पादन महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटकात झाले आहे. ९० लाख टन साखर उत्पादन करून महाराष्ट्र देश अजूनही आघाडीवर आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेर साखर उत्पादन वेगात सुरू राहील, त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील साखर हंगामाची गती मंदावण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.