Poultry Training Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Training : कळवणमधील महिलांना कुक्कुटपालनाचे धडे

Nashik Poultry Training : नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वरखेडा (ता. कळवण) येथे परसबागेतील कुक्कुटपालन प्रात्यक्षिक व तीन दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

Team Agrowon

Nashik News : कळवण तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. येथे शेतीसोबत कुक्कुटपालन व शेळीपालन हे पूरक व्यवसाय आहेत. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प स्वरूपाचे असल्यामुळे शेतीचे उत्पन्न अत्यल्प होते.

शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी व ग्रामीण महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी वरखेडा व करंबेळ या गावातील एकूण १०० शेतकरी महिलांसाठी कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वरखेडा (ता. कळवण) येथे परसबागेतील कुक्कुटपालन प्रात्यक्षिक व तीन दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

या वेळी कुक्कुटपालन पद्धत प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्रामार्फत घेण्यात आले. कृषी व्यवस्थापन व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक यांच्यामार्फत राज्याच्या कृषिविस्तार योजनांना विस्तारविषयक सुधारणांकारिता सहाय्य योजनेअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मालेगावतर्फे कळवण तालुक्यातील वरखेडा व करंबेळ या दोन गावांत ‘परसबागेतील कुक्कुटपालन पद्धत प्रात्यक्षिक’ व ३ दिवसीय ‘कुक्कुटपालन व व्यवस्थापन’ याविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

तीन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विषय विशेषज्ञ संदीप नेरकर यांनी कुक्कुटपालन व व्यवस्थापन यात परसबागेसाठी उत्तम कोंबड्यांच्या जाती व त्यांचे तिन्ही हंगामातील व्यवस्थापन, घरगुती कुक्कुटखाद्य बनविण्याच्या पद्धती, कोंबड्यांचे रोग व लसीकरण, अंडी उत्पादन व कोंबड्यांचे विक्री व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील यांनी महिलांना प्रात्यक्षिकाचे रूपांतर मोठ्या व्यवसायात करावे, असे आवाहन केले. विजय शिंदे यांनी महिलांना शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून गांडूळ खत तयार करावे व आपले उत्पन्न वाढवावे याबाबत तर कळवण तालुका कृषी अधिकारी मीनल म्हस्के यांनी शेतीपूरक व्यवसायचे बळकटीकरण करून जीवनमान उंचावण्याबाबत मार्गदर्शन केले.

सर्वेक्षण करून निवड

प्रात्यक्षिके राबविण्याअगोदर गावातील शेतकऱ्यांचा महिलांचे शेती व्यवसाय व कृषी पूरक व्यवसायानुसार सर्वेक्षण करण्यात आले. निवड केलेल्या बहुसंख्य शेतकरी महिला शेती व्यवसाय व शेतमजुरी करणाऱ्या आहेत.

गावातील १०० महिलांसाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आली. या वेळी कुक्कुटपालनाच्या आवश्यक संपूर्ण साहित्याचे वाटप करण्यात आले. यात प्रत्येक महिलेस, कावेरी जातीच्या कोंबडीचे १ महिने वयाची एकूण २५ पिल्ले, १५ किलो कोंबडी खाद्य, एक पाणी पिण्याचे भांडे व १ खाद्याचे भांडे याप्रमाणे वाटप करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT