Potato  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : सातगाव पठारावरील बटाटा पीक पावसामुळे धोक्यात

Potato Crop Damage : सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथे रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बटाटा पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Team Agrowon

Pune News : सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथे रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बटाटा पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेले पाणी काढून देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सूर्यदर्शन नसल्याने अडीच हजार एकर क्षेत्रातील २५ ते ३० टक्के बटाटा उत्पादनात घट होईल, अशी भीती बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कारेगाव, कुरवंडी, पेठ, थुगाव, भावडी, कोल्हारवाडी, पारगावतर्फे खेड आदी गावात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे बटाटा उत्पादक शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या भागातील खरीप हंगामातील बटाटा हे मुख्य पीक आहे. बटाटा पिकावरच येथील कुटुंबातील मुलांचे शिक्षण व अन्य खर्च दरवर्षी भागवतात.

बटाटा पीक काही ठिकाणी फुलोऱ्यात आले असून, ५५ ते ६० दिवसाचे पीक झाले आहे. झाडांना बटाटे लगडलेले आहेत. साधारण अडीच महिन्यात बटाटा पीक काढणीयोग्य होते. सद्यःस्थितीत सूर्यप्रकाशाची फार गरज आहे. पण गेल्या दहा दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे बटाटा पिकाची वाढ पुरेशा प्रमाणात होणार नाही, असे कारेगाव येथील बटाटा उत्पादक शेतकरी मोहन ज्ञानेश्वर सणस यांनी सांगितले.

खते, औषधे, मजुरी असा एकरी 65 ते 70 हजार रुपये खर्च झाला आहे. हातातोंडाशी आलेले बटाटा पीक वारंवार पडत असलेल्या पावसामुळे व शेतात साचत असलेल्या पाण्यामुळे अडचणीत आले आहे. अजूनही पाऊस सुरू राहिल्यास बटाटा पिकाला धोका होऊ शकतो, असे पारगावतर्फे खेड येथील बटाटा उत्पादक शेतकरी व आंबेगाव बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.

वाटाणा पीक वाया गेले.

गेली दोन- तीन वर्ष उत्पादित बटाट्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांनी वाटाणा पीक घेण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले होते. यावर्षी जवळपास ६००हून अधिक क्षेत्रात वाटाणा पीक घेतले होते. अर्कल जातीचे वाटाणा पीक 35 दिवसांत तर गोल्डन जातीचे वाटाणा पीक 55 दिवसांत काढणीयोग्य होते. वेलवर्गीय पीक असल्यामुळे व पाण्याखाली पीक गेल्यामुळे पूर्णपणे वाया गेले आहे. त्यामुळे वटाणा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT