Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar : साखर संघाच्या हस्तक्षेप याचिकेस स्थगिती ः शेट्टी

उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेमध्ये राज्य साखर संघाने हस्तक्षेप याचिका दाखल करून घेण्याची मागणी केली होती.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : ‘‘उसाची एफआरपी (Sugarcane FRP) दोन टप्प्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेमध्ये राज्य साखर संघाने हस्तक्षेप याचिका दाखल करून घेण्याची मागणी केली होती. या मागणीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे,’’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली.

शेट्टी म्हणाले, ‘‘उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरूध्द माझ्यासह १० शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेमध्ये राज्य साखर संघाने आपले म्हणणे ऐकून घेऊन मगच निर्णय द्यावा, अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला असता मुंबई उच्च न्यायालयाने या मागणीस तूर्त स्थगिती दिली आहे.’’

‘‘न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता खंडपीठाने या याचिकेवर केंद्र व राज्य सरकार यांना तीन आठवड्यात उत्तर देण्याबाबत निर्देश दिले आहेत. आमचे वकील ॲड. योगेश पांडे यांनी विरोध केल्याने हस्तक्षेप याचिका प्रलंबित ठेवण्यात आली आहे,’’ असे शेट्टी यांनी सांगितले.

इथून पुढील काळात देखील दोन टप्प्यातील एफआरपीच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील.
राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT