Kolhapur Lumpy News agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Lumpy News : लम्पीने दगावलेल्या जनावरांच्या पंचनाम्यासाठी डॉक्टर मागतात पैसे

Veterinary Officer : दोन्ही गाईच्या तपासणीसाठी दोनवेळा भेटी दिल्या. यावेळी प्रति दोनशे रुपये असे एकूण चारशे रुपये पंचनामा करण्यासाठी घेतले.

sandeep Shirguppe

Lumpy News Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याच्या खुपिरे गावात पशुवैद्यकीय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकरी महिलेकडून लम्पीने दगावलेल्या दोन जनावरांना नुकसानभरपाई देण्याकरिता पंचनामा करण्यासाठी डॉक्टरनी चारशे रुपये घेतल्याचा प्रकार घडला.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान डॉक्टरांना निलंबित करावे अन्यथा जिल्हा परिषद समोर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता तानाजी हराळे यांच्या दोन गाई लम्पीने दगावल्या. यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर प्रमोद लोखंडे यांना बोलावले. त्यांनी दोन्ही गाईच्या तपासणीसाठी दोनवेळा भेटी दिल्या. यावेळी प्रति दोनशे रुपये असे एकूण चारशे रुपये पंचनामा करण्यासाठी घेतले.

मात्र गेली दोन महिने त्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नाही. पुन्हा तिसरे जनावर दगावले; पण दोनशे रुपये द्यायला नाहीत हे सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. नुकसानीबाबत पाच पानांचा अर्ज देण्यासाठी प्रत्येकी ६० रुपये डॉक्टरांनी घेतले.

मात्र नुकसानभरपाई मिळाली नाही. म्हणून आज संतप्त झालेल्या पशुपालकांनी ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरना घेराओ घातला. यावेळी उपसरपंच सागर पाटील, सदस्य भगवान हराळे, महेश पाटील, शिवाजी चव्हाण, संजय पोरलेकर, दगडू चौगले, विलास चौगले, संजय हराळे, शेतकरी उपस्थित होते.

डॉक्टरांनी पैसे घेतले असतील, तर चौकशी करून कारवाई करू. पशुपालकांकडून पैसे घेऊ नये. ही बाब चुकीची असल्याची माहिती जिल्हा पशुधन अधिकारी पी. व्ही. बाबर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: आत्महत्या, की व्यवस्थेचा बळी!

Crop Damage: राज्यातील पीक नुकसानीकडे गांभीर्याने पाहा : शरद पवार

Rakesh Tikait: महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही

Contractual Workers: कंत्राटी साखर कामगारांना कायम केल्यास स्थैर्य 

Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक

SCROLL FOR NEXT