Diet of Milky Animals Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Care : विल्यानंतर गाय, म्हशींचा आहार कसा असावा?

Animal Diet : काही पशुपालक विल्यानंतर जनावरांला योग्य आहार देत नाहीत.त्यामुळे दुध उत्पादनात घट होते. दुध टिकवून ठेवायच असेल तर विल्यानंतर गायी म्हशीच्या आहाराच योग्य नियोजन कराव लागत.

Team Agrowon

काही पशुपालक विल्यानंतर जनावरांला योग्य आहार देत नाहीत.त्यामुळे दुध उत्पादनात घट होते. दुध टिकवून ठेवायच असेल तर विल्यानंतर गायी म्हशीच्या आहाराच योग्य नियोजन कराव लागत.

जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांच्या जाती, प्रजाती, आनुवांशिकता, वेत आणि वय यावर अवलंबून असते, तर काही अंशी नैसर्गिक ऋतुचक्रावर अवलंबून असते. त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात चढ-उतार होत असला तरीही आवश्यक समतोल आहार, पालन-पोषण, काळजी, निगा, आरोग्य आणि योग्य व्यवस्थापन केल्यास दूध  उत्पादनामध्ये वाढ करता येऊ शकते.        

गाय, म्हैस, शेळ्या या जनावरांमध्ये जातींनुसार दुधाचे व दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे एकाच जातीच्या दोन गायी-म्हशींनी सारखेच दूध  द्यावे, असा अट्टाहास करू नये. उन्हाळ्यात दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश थोडे कमी, तर हिवाळ्यात थोडे जास्त असते. विदेशी वंशाच्या गायीच्या तुलनेत देशी गायींचे दूध उत्पादन कमी असत. कारण त्यांचा विकास व जडणघडण  उष्ण वातावरणाशी जुळवून घेत होत असतो. 

विल्यानंतर गाय किंवा म्हशीला कसा आहार द्यावा.  

जनावर विल्यानंतर पहिले चार दिवस जवळपास २ किलो गव्हांडा, दिड किलो गूळ, २ चमचे मीठ व क्षारयुक्त मिश्रण द्यावे. पहिले तीन महिने दिवसातील संपूर्ण २८ ते ३० किलो आहार तीन वेळा विभागून दिल्यास दूध उत्पादन चांगल्या प्रकारे मिळते.रोजच्या शरीर पोषणासाठी जवळजवळ एक ते दिड किलो देशी गायींसाठी, तर २ किलो खुराक संकरित गाय किंवा म्हशीसाठी द्यायला हवा. दुधाळ जनावराला वजनाच्या २ ते ३.५ टक्के सुका चारा द्यावा. प्रती तीन लिटर दुधामागे प्रत्येक दिवशी एक ते दीड किलो जास्तीचा खुराक द्यावा.

दुधाळ गायी व म्हशीला दररोज १५ ते २० किलो हिरवा चारा बारीक तुकडे करून, तसेच ४ ते ८ किलो सुका चारा दिल्यास दुग्ध उत्पादनात फायदा मिळू शकतो. आहारामध्ये जास्त प्रथिने, खनिज मिश्रण असलेले खाद्य द्याव. खनिजांचा पुरवठा होण्यासाठी शेवग्याच्या झाडाचा पाला दिल्यास फायदा होतो. दररोज २० ग्रॅम खनिज मिश्रण खाद्यातून दिल्यास दुध उत्पादन वाढत. याशिवाय  मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी पाजावे.तसेच उन्हाळ्यात  काही महत्त्वाच्या बाबींची काळजी व व्यवस्थापन केल्यास दुधाच्या व स्निग्धांशांच्या प्रमाणात फरक जाणवतो. दूध एकाच माणसाच्या हाताने ठरावीक वेळेतच व समान अंतराने काढावे. शेवटची धार पूर्णपणे काढावी, त्यात स्निग्धांशांचे प्रमाण वाढते.जनावरे आणि गोठा स्वच्छ ठेवावा. अशा प्रकारे काळजी घेतल्यास दुध उत्पादन वाढण्यास मदत होते.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT