Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : सोलापुरात होणार उसाची पळवापळवी

Sugarcane Crushing : सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा असला, तरी उजनीमुळे जिल्ह्यात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात गेल्या वर्षी पाऊस कमी झाला आणि यंदाही पुन्हा कमी पाऊसमानामुळे उसाच्या वाढीसह नव्याने लागवड क्षेत्रात घट झाली आहे. पण दुसरीकडे या वर्षीच्या हंगामासाठी तब्बल ३७ साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी मागितली आहे. परिणामी, कारखान्यांना गाळपासाठी मोठ्या प्रमाणात उसाचा तुटवडा भासणार आहे आणि या उसासाठी कारखान्यांमध्ये उसाची पळवापळवी होणार असे चित्र आहे.

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा असला, तरी उजनीमुळे जिल्ह्यात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पण अलीकडच्या काही वर्षांत कमी पाऊसमानामुळे ऊस उत्पादन आणि त्याच्या उताऱ्यावर परिणाम झाला आहे. कोल्हापूरनंतर ऊसगाळपामध्ये सर्वाधिक आघाडीवर असणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख सांगितली जाते.

शिवाय राज्यात सर्वाधिक ४१ साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणूनही जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात उजनीच्या बॅकवॅाटरसह पुढच्या भागात प्रामुख्याने माढा, पंढरपूर, करमाळा, माळशिरस, मोहोळ या तालुक्यासह मंगळवेढा, बार्शीच्या काही भागात ऊसक्षेत्र विस्तारत गेले.

त्याशिवाय उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि सांगोला या तालुक्यातही बऱ्यापैकी क्षेत्र राहिले आहे. यंदा सुमारे दोन लाख ४० हजार हेक्टरपर्यंत ऊसक्षेत्र पोचले आहे.

पण उपलब्ध उसाच्या प्रमाणात कारखान्यांची संख्या मात्र दुप्पट-तिप्पट वाढल्याने उसाची टंचाई जाणवते आहे. यंदा नव्याने लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. त्याचा परिणाम हंगामावर होईल. त्यात तब्बल ४१ पैकी ३७ साखर कारखान्यांनी गाळपासाठी आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे.

त्यामुळे कोणत्या कारखान्यांना किती, कसा ऊस मिळणार, किती कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार, याबाबत साशंकता आहे, त्यातूनच मग उसाच्या पळवापळवीचे प्रकार होणार आहेत.

ऊसदर जाहीर करण्याची स्पर्धा

गेल्या अनेक वर्षांचा अनुभव विचारात घेता, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला मोठी धार आल्याशिवाय किंवा प्रत्यक्षात गाळप सुरू झाल्याशिवाय ऊसदराबाबत कोणतेच कारखाने बोलत नव्हते. यंदा मात्र उसाची टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन अनेक साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल प्रतिटन २५०० रुपये जाहीर केली आहे.

काहींनी २७०० रुपये, तर सिद्धेश्वर साखर कारखान्याने तर २९०० रुपयांपर्यंतच्या दराची घोषणा केली आहे. कारखान्याची ही धडपड केवळ ऊस मिळविण्यासाठी आहे, हे मात्र आता लपून राहिलेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT