Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण २२ लाख ३६ हजार ७८१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २८ लाख ६९ हजार ४७७ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. काही ठिकाणी रब्बीच्या काही पिकांची काढणी आटोपली तर काही ठिकाणी सुरू असून बीड जिल्ह्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. दुसरीकडे लातूर विभागातील तीन जिल्ह्यात सुमारे ८९५६ हेक्टरवर उन्हाळी पेरणी झाली आहे..पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यातील सर्वसाधारण ७ लाख २७ हजार ५७४.८२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १० लाख ९३ हजार ७२३ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १५०.३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात सर्वसाधारण १५ लाख ९ हजार २०७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १७ लाख २५ हजार ७५४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली..Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र.जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११७.६६ टक्के आहे. अति पावसामुळे रब्बीची पेरणी तीन ते चार टप्प्यात झाली. त्यामुळे रब्बी पिकातील बहुतांश पिके वेगवेगळ्या अवस्थेत दिसतात. रब्बी ज्वारी कुठे कणसे भरण्याच्या अवस्थेत तर कुठे अजून कणसे निसवण्याच्या व पोटऱ्यात तर काही ठिकाणी काढणी व मळणी सुरू असल्याची स्थिती आहे. हरभरा पीक पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे..रब्बी ज्वारी वर अल्प प्रमाणात लष्करी प्रचार प्रादुर्भाव दिसत असून हरभरा पिकावर काही ठिकाणी मन रोगाचा व घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. लातूर कृषी विभागातील उन्हाळी पेरणी झालेल्या तीन जिल्ह्यात लातूर जिल्ह्यातील १६७४ हेक्टर, परभणीतील १०८३ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यातील ६२२५ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..Rabi Crops: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत १० लाख ७५ हजार हेक्टरवर रब्बी पिके.३७ हजार हेक्टरवर फटकामराठवाड्यातील सुमारे ३७१०६ हेक्टरवरील रब्बी पीक, फळपिकांना अवकाळीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणी, अंबाजोगाई, परळी तालुक्यातील १२७ गावातील ३६५९३ शेतकऱ्यांच्या २१४२५ हेक्टर तर लातूर कृषी विभागातील १५६८१ हेक्टरवरील रब्बी पीक व फळपिकांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..जिल्हानिहाय रब्बी सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रजिल्हा छत्रपतीसंभाजीनगरसर्वसाधारण क्षेत्र २३८८२१प्रत्यक्ष पेरणी ३११५९७टक्केवारी १३०.४७जिल्हा जालनासर्वसाधारण क्षेत्र २११८१९प्रत्यक्ष पेरणी ३१४०८९टक्केवारी १४८.२८.जिल्हा बीडसर्वसाधारण क्षेत्र २७६९३३प्रत्यक्ष पेरणी ४६८०३७टक्केवारी १६९.०१जिल्हा लातूरसर्वसाधारण क्षेत्र ३१८६८८प्रत्यक्ष पेरणी ३९२२९७टक्केवारी १२३.१०.जिल्हा धाराशिवसर्वसाधारण क्षेत्र ४१७९०२प्रत्यक्ष पेरणी ४६१५०९टक्केवारी ११७.६२जिल्हा नांदेडसर्वसाधारण क्षेत्र ३३२४१६प्रत्यक्ष पेरणी ३९०९७३टक्केवारी ११७.६२.जिल्हा परभणीसर्वसाधारण क्षेत्र २७०९७९प्रत्यक्ष पेरणी ३१५७२२टक्केवारी ११६.५१जिल्हा हिंगोलीसर्वसाधारण क्षेत्र १६९२२२प्रत्यक्ष पेरणी २१५२५१टक्केवारी १२७.२०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.