Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : परभणी जिल्ह्यात कमी पावसामुळे रब्बी पेरणी क्षेत्रात घटीची शक्यता

Rabi Season : जिल्ह्यात यंदा (२०२३-२४) रब्बी हंगामात २ लाख ८७ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. परंतु यंदा सरासरीच्या तुलनेत २६०.८ मिलिमीटर पावसाची तुट आली आहे.

माणिक रासवे

Parbhani News : जिल्ह्यात यंदा (२०२३-२४) रब्बी हंगामात २ लाख ८७ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. परंतु यंदा सरासरीच्या तुलनेत २६०.८ मिलिमीटर पावसाची तुट आली आहे. जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी आहे.

सिंचन स्रोतांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नाही. परिणामी यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात मोठी घट होण्याची दाट शक्यता आहे. यंदा ज्वारीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. गहू, हरभऱ्याचे क्षेत्र कमी राहील, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ४० हजार ९७७ हेक्टर आहे. गतवर्षी (२०२२-२३) रब्बीत २ लाख ९५ हजार ४६२ हेक्टरवर (१०९.११ टक्के) पेरणी झाली होती. त्याआधी २०२१-२२ मध्ये २ लाख ५४ हजार हेक्टर (११७.८२ टक्के) तर २०२२-२१ मध्ये २ लाख ५९ हजार हेक्टर (१२०.३९ टक्के) पेरणी झाली होती. यंदा (२०२३) रब्बीत २ लाख ८७ हजार २०० हेक्टर पेरणी प्रस्तावित असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले जात आहे.

यंदा सोमवार (ता. ९) अखेर सरासरी ७८३.८ मिलिमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५२३ मिलिमीटर (६६.७ टक्के) पाऊस झाला आहे. यंदा सरासरासरीच्या तुलनेत २६०.८ मिलिमीटर पावसाची तुट आली आहे. जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पात केवळ १४ टक्के, मध्यम प्रकल्पात सरासरी २५ टक्के, दुधना प्रकल्पात २७.८० टक्के, माजलगाव धरणात ११.७९ टक्के, येलदरी धरणात ६२.२८ टक्के, जायकवाडी धरणात ४७.७० टक्के पाणीसाठा आहे.

विहिरी, बोअरच्या पाणी पातळीत कमी वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात सिंचनासाठी पाण्याची कमतरता राहणार आहे. गेल्या आठ ते दहा दिवसात पाऊस झालेला नाही. तापमानात ३५ अंश सेल्सिअस पेक्षा वाढ झाली आहे.

जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. खरीप पिकांच्या काढणी अजून काही दिवस लागू शकतात. दरम्यानच्या काळात पाऊस झाला तर पेरणीसाठी ओलावा उपलब्ध होऊ शकेल. अन्यथा ओलाव्या अभावी रब्बीचे मोठे क्षेत्र यंदा नापेर राहू शकते.

रब्बी हंगाम २०२३ पेरणी प्रस्तावित क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण पेरणी क्षेत्र

ज्वारी १०६००८ १०१००००

गहू ४०५५७ ३००००

हरभरा ८८९४७ १५१०००

करडई २०९८ १९५०

सूर्यफूल ९५० १०००

मका १७५ १७००

इतर ६६२ ५५०

यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सिंचनासाठी कमी पाणी उपलब्ध राहील. ज्वारीचे क्षेत्र वाढू शकेल. गव्हाचा पेरा कमी राहील.
- आर. बी. हरणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT