Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूध दरवाढीची शक्यता

Milk Market : पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दुधाचे विक्रीदर वाढवून मिळण्यास अनुकूल स्थिती तयार होऊ शकते, अशी माहिती दूध उद्योगातील सूत्रांनी दिली.

Team Agrowon

Pune News : शिगेला पोचलेला उन्हाळा आणि दूध संकलनात हळूहळू होणारी घट यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दुधाचे विक्रीदर वाढवून मिळण्यास अनुकूल स्थिती तयार होऊ शकते, अशी माहिती दूध उद्योगातील सूत्रांनी दिली.

अर्थात, या मागणीमुळे दुधाच्या मागणीत मोठी वाढ झालेली नाही. परिणामी दूध टंचाईसारखे चित्र राज्यात तयार झाल्याचे सध्या तरी दिसत नाही.

श्री. कुतवळ यांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळा व दुधाचे कमी खरेदीदर यामुळे राज्याच्या एकूण दूध संकलनात ८-१० टक्के घट झालेली आहे. परंतु त्यामुळे दुधाचे खरेदीदर झटपट वाढतील, अशी स्थिती सध्याची नाही. पुढील महिन्यात मात्र दुधाचे दर वाढू शकतात. ही दरवाढ नेमकी किती असेल, याचा अंदाज सध्या वर्तविता येणार नाही.

लोणी व दूध भुकटीचे बाजार मात्र दूध दरवाढीसाठी अनुकूल चित्र दाखवत आहेत. दूध प्रकल्पांसाठी लोण्याचे दर प्रतिकिलो ३३० रुपयांच्या आसपास आहेत. दूध भुकटीचा दर थोडा वाढून तो २१५ पासून २२५ रुपयांपर्यंत गेला आहे.

“लोणी किंवा दूध भुकटीचे दर भविष्यात वाढले तर चित्र बदलू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधाचे खरेदीदर वाढवून देण्यास दूध प्रकल्पांना अनुकूल स्थिती तयार होऊ शकते,” असे श्री. कुतवळ यांनी स्पष्ट केले.

दूध भुकटी व लोण्याचे दर अपेक्षितरीत्या वाढलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध खरेदीदरात निश्चित किती व केव्हा वाढ होईल, याचा अंदाज बांधता येत नाही.
श्रीपाद चितळे, संचालक, चितळे डेअरी उद्योग समूह

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT