Milk Rate : रिव्हर्स रेट वाढवून दूध खरेदीदर पाडण्यास सरकारची मूकसंमती आहे का?

Milk MSP : सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करून रिव्हर्स रेट पूर्ववत करावेत व शेतकऱ्यांना किमान ३५ रुपये दर मिळतील याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत असून, दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील याबाबत मौन बाळगून आहेत.
Milk Rate
Milk Rateagrowon
Published on
Updated on

Pune News : गायीच्या दुधाला प्रति लिटर किमान ३५ रुपये दर द्यावा, या मागणीसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, राज्यातील विविध शेतकरी संघटना व शेतकरी नेत्यांनी केलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने हस्तक्षेप करत दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा, असे निर्देश दिले.

त्यानंतर खासगी व सहकारी दूध संघांनी संगनमत करून ३.५/८.५ गुणवत्तेच्या दुधाला ३४ रुपये दर जाहीर केले, मात्र फॅट व एसएनएफचे रिव्हर्स दर वाढवून शेतकऱ्यांना मिळत होते त्यापेक्षाही कमी दर मिळतील, अशी व्यवस्था केली.

सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करून रिव्हर्स रेट पूर्ववत करावेत व शेतकऱ्यांना किमान ३५ रुपये दर मिळतील याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत असून, दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील याबाबत मौन बाळगून आहेत. सरकारचे हे मौन शेतकऱ्यांची लूट सुरू ठेवण्यासाठीची मूक संमती आहे का, असा सवाल या निमित्ताने शेतकरी उपस्थित करत आहेत.

Milk Rate
Milk Rate : कशी फुटेल दूधदर कोंडी?

शेतकऱ्यांना दूध संघांनी व दूध कंपन्यांनी गायीच्या दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा यासाठी शासन आदेश काढण्यापूर्वी फॅटचा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या १ पॉइंटसाठी २० पैसे होता. आता तो सरळ ५० पैसे करण्यात आला आहे. एसएनएफचा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या १ पॉइंटसाठी ३० पैसे होता, आता तो १ रुपया करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना यामुळे फक्त २५ ते ३० रुपये दर मिळत आहेत.

Milk Rate
Milk Rate : दूध उत्पादकांना लिटरमागे ३ रुपयांचा फटका

महाराष्ट्रात पशुधनाचे संकरीकरण करताना वापरण्यात आलेल्या पद्धती व बीजामुळे बहुतांश संकरित गायींच्या दुधाला कमी फॅट व एसएनएफ बसते. शिवाय सध्या पावसाळा असल्याने व हिरवा चारा उपलब्ध असल्यानेही दुधाचे फॅट व एसएनएफ कमी झाले आहे. परिणामी रिव्हर्स रेट वाढविण्यात आल्याने दूध व्यवसाय तोट्यात गेला आहे. रिव्हर्स पॉइंटमुळे दूध उत्पादकांना प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची तूट सोसावी लागत आहे.

सरकारने दूधदर वाढविण्यासोबतच पशुखाद्याचे दर २५ टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र हे दर कमी करण्याऐवजी १ ऑगस्टपासून ५ टक्क्यांनी वाढले आहेत. शासनाने दूध उत्पादकांच्या प्रश्‍नांची तातडीने दखल घ्यावी.

गायीच्या दुधाला ३४ रुपये दर देत असताना रिव्हर्स रेट पूर्ववत करत फॅट रिव्हर्स रेट २० पैसे व एसएनएफ रिव्हर्स रेट ३० पैसे करावेत व पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, अशोक ढगे, जोतिराम जाधव, दादा गाढवे, राजकुमार झोरी, श्रीकांत कारे, रामनाथ वदक, दीपक वाळे, मंगेश कान्होरे, दीपक पानसरे, सुहास रंधे, अमोल गोर्डे यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com