Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Pest : ओंबीवरील ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

Paddy Farming : यंदा खरीप हंगामात पाऊस वेळेवर सुरू झाला आहे. यंदा शेतकऱ्यांसाठी भातपीक चांगले येण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : यंदा खरीप हंगामात पाऊस वेळेवर सुरू झाला आहे. यंदा शेतकऱ्यांसाठी भातपीक चांगले येण्याची शक्यता आहे. विशेषतः वरकस जमिनीवरील हळव्या जातीची पीक परिस्थिती उत्तम आहे. आता पीक कापणीच्या अवस्थेमध्ये आहे.

निमगरव्या व गरव्या जातीला कापणीस अजून १५ ते ३० दिवस लागतील. गरव्या जाती १३५ दिवसांपेक्षा आता फुलोऱ्यावर आलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये ओंबीवरील ढेकण्या (गंडीबग) किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, असे शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पाऊस कमी झाला असून, ऊन पडत आहे. त्यामुळे ओंबीवरील ढेकण्या ही कीड वाढण्याची शक्यता आहे तसेच या किडीचे दुष्परिणाम उशिरा दिसतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात जाऊन झाडे हलवून कीड उडते की नाही हे पाहणे गरजेचे आहे. वेळीच नियंत्रण केल्यास उत्पादनात घट होणार नाही. हळव्या म्हणेजच १०० ते १२० दिवस, निमगरव्या १२० ते १३५ दिवस, भातजातीच्या खाचरातील पाणी कमी करावे, निचरा करावा.

भातकापणीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वैभव विळ्याचा वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी भातकापणीला सुरुवात झाली आहे; मात्र दसऱ्यापर्यंत पावसाची शक्यता असल्याने सकाळी भातकापणी करून दुपारी दोनपर्यंत उचलावे व त्यानंतर ताबडतोब शेडमध्ये झोडावे.

असे भात रचून ठेवू नयेत. झोडलेले भात घरात पसरवून ठेवावेत. शक्य असल्यास पंख्याचा वापर सुकवणे व वाळवण्यासाठी करावा. त्यानंतर ४ ते ५ दिवस उन्हामध्ये वाळवावे. भात कापून चांगले वाळले नसल्यास व तसेच जर रचून ठेवून १ ते २ महिन्यांची झोडणी आणि मळणी केल्यास, भात व पेंढा खराब होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मिळणाऱ्या तांदळाची प्रतसुद्धा खराब होते. तांदळामध्ये तूट होते, रंग बदलतो त्यामुळे ताबडतोब मळणी करणे आवश्यक आहे.

यंदा भातशेतीला पोषक पाऊस आहे. त्यामुळे सरासरी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी शासनाने २ हजार ३०० प्रतिक्विंटल हा खरेदीचा दर दिलेला आहे. तरी प्रत्येक तालुक्यामध्ये साधारणपणे डिसेंबरमध्ये शासनाकडून खरेदी केला जाईल. तोपर्यंत शेतकऱ्यांनी भात चांगले वाळवून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.- विजय दळवी, प्रभारी अधिकारी, शिरगाव कृषी संशोधन केंद्र, रत्नागिरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT