Sugar Production agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : देशात ३१८ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता

Sugar Season : देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. विशेष म्हणज हंगामाच्या सुरुवातीला यंदाचा हंगाम लवकर संपण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : कोल्हापूर : देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. विशेष म्हणज हंगामाच्या सुरुवातीला यंदाचा हंगाम लवकर संपण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. याऊलट स्‍थिती सध्या आहे. मार्चअखेर देशभरातील २०९ कारखान्यांत ऊस गाळप सुरू आहे. आजच्या तारखेला गेल्‍या वर्षीच्या तुलनेत २४ साखर कारखाने जादा सुरू आहेत. हंगामअखेर देशातील निव्वळ साखर उत्पादन ३१८ लाख टन होण्याची शक्यता आहे.

या कालावधीत २९५० लाख टन ऊस गाळप झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा १०२ लाख टन ऊस गाळप कमी आहे. ऊस गाळप कमी असले तरी सरासरी साखर उताऱ्यात ०.२८ टक्के वाढ झाल्याने निव्वळ ३०० लाख टन साखर उत्पादन हे जवळपास गेल्यावर्षी मार्चअखेर झालेल्या साखर उत्पादनाच्या बरोबरीने असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देण्यात आली. 

ज्या उत्तर प्रदेशने दोन वर्षांत साखर उत्पादनात अग्रक्रम राखला होता त्या राज्यातील या अगोदरच्या ११५ लाख टन साखर उत्पादनाच्या अंदाजाच्या तुलनेत मार्चअखेर ९७ लाख टन उत्पादन झाले आहे. हंगामअखेर ते १०५ लाख टनांपर्यंत सीमित होणे अपेक्षित आहे.
महासंघाच्या माहितीनुसार महाराष्ट्राने मार्चअखेर केलेल्या १०७ लाख टन साखर उत्पादनामुळे आणि अजूनही ६७ साखर कारखान्यांत सुरू असलेले साखर उत्पादन लक्षात घेता हंगामअखेर १०९ लाख टन साखर उत्पादन करून महाराष्ट्र देशात साखर उत्पादनात अग्रेसर राहील, अशी शक्यता आहे. 

कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू व उत्तर आणि दक्षिणेतील इतर सर्व राज्ये मिळून यंदाच्या हंगामअखेर देशातील निव्वळ साखर उत्पादन ३१८ लाख टन होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या अंतिम ३३०.९० लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत ते यंदा सुमारे १३ लाख टनांनी कमी राहणार आहे. या व्यतिरिक्त १७ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविण्यात आलेली आहे.

१० लाख टन साखर निर्यातीस परवानगीची मागणी


इंडियन शुगर्स ॲंन्ड बायोएनर्जी मॅन्युफॅक्‍चर्स असोसिएशने (इस्मा) केंद्राकडे १० लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याची मागणी केली आहे. ‘इस्मा’ने यंदाच्या हंगामात ३२० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्‍यक्त केला आहे. यापैकी २८५ लाख टन साखर घरगुती वापर अपेक्षित आहे. पुढील हंगाम सुरू होण्‍यापर्यंत ९१ लाख टन साखर शिल्लक राहू शकते. यामुळे घरगुती वापर, इथेनॉल निर्मिती आणि शिल्लक साखर याची माहिती घेऊन केंद्राने यंदाच्या हंगामात तयार होणाऱ्या साखरेच्या निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

१५ ते १८ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवणे शक्य
सुरुवातीच्या अंदाजापेक्षा अतिरिक्त उत्पादित होणाऱ्या साखरेचा विचार करता तसेच हंगाम सुरुवातीची शिल्लक साखर आणि साखर निर्यातीवरील बंदी ध्यानात घेता किमान १५ ते १८ लाख टन अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी होऊ शकतो. विशेषतः केंद्र शासनाने डिसेंबरमध्ये अकस्मात लादलेल्या इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे जो बी हेवी मळीचा शिल्लक साठा कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पात अडकून पडला आहे, 

त्याचा पूर्ण वापर केल्यास १७० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन वाढू शकते. त्याद्वारे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण केंद्र शासनाने निश्चित केलेल्या लक्ष्यपूर्तीसाठी हातभार लावू शकते, असे निवेदन केंद्र शासनाशी संबंधित मंत्रालयांकडे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिले आहे व त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT