Thackeray-Ambedkar Yuti
Thackeray-Ambedkar Yuti Agrowon
ॲग्रो विशेष

Thackeray-Ambedkar Yuti : ठाकरे-आंबेडकर युतीमुळे बदलणार राजकीय समीकरणे?

Vinod Ingole

Yavtmal News : यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या खासदार भावना गवळीदेखील (MP Bhavana Gawali) शिंदे गटासोबत गेल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा जिल्ह्याच्या सत्तेतील सहभाग शून्य आहे.

आता मात्र आंबेडकर-ठाकरे गटातील युतीमुळे (Thackeray-Ambedkar Yuti) जिल्ह्यात राजकीय समीकरण बदलणार, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

विकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत बंडाळी उठली आणि अनेक आमदार, खासदारांनी वेगळी चूल मांडली. त्याच्याच परिणामी राज्यात महाविकास आघाडीचे सरकारही कोसळले.

शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी देखील शिंदे गटाचेच शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाशी संलग्न शिवसेनेचा एकही आमदार किंवा लोकप्रतिनिधी जिल्ह्यात नाही.

आता शिवसेना (ठाकरे गट) व प्रकाश आंबेडकर सर्वेसर्वा असलेल्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली. काही दिवसांपूर्वी याची घोषणा करण्यात आली.

या दोन्ही पक्षांना जिल्ह्यातील मतदारांची चांगली पसंती आहे. त्यामुळेच या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, अशी अपेक्षा राजकीय जाणकार व्यक्‍त करतात.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित लढल्यास त्यात काहीसा चमत्कार होऊ शकतो, असेही सांगितले जाते. त्याचाच बेस घेत पुढील निवडणुकांची रणनीती या दोन्ही पक्षांना आखता येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील यश-अपयश हे दोन्ही पक्षांसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. जिल्ह्याचा विस्तार मोठा असून, उमरखेड-हिंगोली, वणी-चंद्रपूर तसेच यवतमाळ-वाशीम असे तीन जिल्ह्यांचा अंतर्भाव असलेले लोकसभा मतदार संघ आहेत.

त्यामुळे लोकसभा लढविणाऱ्यांना दोन जिल्ह्यांत प्रचार यंत्रणा राबवावी लागते. त्याच कारणामुळे या जिल्ह्यातील लढती अत्यंत चुरशीच्या ठरतात.

गेल्या वेळी वंचितने एमआयएम सोबत युती करीत वणी-चंद्रपूर लोकसभा लढविली होती. त्यावेळी वंचितच्या उमेदवाराने चांगले मताधिक्‍य मिळविले होते. दुसरीकडे यवतमाळ जिल्हा हा शिवसेनेचा गड ओळखला जातो.

शिवसेनेची या जिल्ह्यात पकड आहे. त्यातच आता वंचितसोबत शिवसेनेची युती झाल्याने त्याचा फायदा होईल, अशी शक्‍यता आहे.

वंचितची एक विशेष व्होट बॅंक आहे. बहुजन समाजात सोशल इंजिनअरिंगचा फॉर्म्युला या पक्षाने अकोल्यात यशस्वी केला आहे. दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची विचारधारा मानणारा मोठा वर्ग आहे. परिणामी, ही युती चमत्कार घडवेल यात कोणालाही शंका असण्याचे कारणच नाही.
संजय देशमुख, राज्यमंत्री तसेच शिवसेना नेते, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT