POCRA  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development Plan : ‘पोकरा’अंतर्गत गाव विकास आराखडे गांभीर्यपूर्वक तयार करा

POCRA 2.0 : ‘पोकरा’टप्पा २ अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना हवामान बदलांच्या स्थितीत जुळवून घेत सक्षम करायचे आहे.

Team Agrowon

Parbhani News : ‘पोकरा’टप्पा २ अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना हवामान बदलांच्या स्थितीत जुळवून घेत सक्षम करायचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापर करून नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करायचा आहे. त्यासाठी सक्रिय लोकसहभाग हवा आहे. कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी गाव विकास आराखडे गांभीर्यपूर्वक तयार करावेत. गावाच्या पाण्याचा ताळेबंद मांडावा, असे निर्देश पोकराचे संचालक परिमल सिंह यांनी दिले.

कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे आयोजित खरीप हंगामपूर्व मराठवाडा विभागस्तरीय कार्यशाळेत बुधवारी (ता. ३०) ते बोलत होते. ‘आत्मा’चे संचालक अशोक किरनाळी, कृषी संचालक साहेबराव दिवेकर (लातूर), प्रकाश देशमुख (छत्रपती संभाजी नगर), ‘पोकरा’चे मृदा शास्त्रज्ञ विजय कोळेकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, डॉ. राकेश अहिरे आदी उपस्थित होते.

परिमल सिंह म्हणाले, की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प : पोकरा) अंमलबजावणी १५ जूनपासून करण्याची तयारी सुरू आहे. त्याअनुषंगाने ‘पोकरा’अंतर्गत निवड झालेल्या त्यादृष्टीने शिवार फेरी, मशाल फेरी काढून लोकसहभागातून गाव विकास आराखडे तयार केले जात आहेत. गावात पाणी, माती या नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात येणार आहे.

कर्ब उत्सर्जन कमी करून जमिनीतील कर्ब ग्रहण वाढवावे लागेल. मातीचे आरोग्य सुधारले का याची पडताळणी करणे आवश्यक आहे. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक संवर्धित शेती पद्धतीचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करावा.

पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने डिजिटल शेती शाळा च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. आदिवासी पाडे तसेच दुर्लक्षित गावात कृषी विस्तार कार्य पोहोचले पाहिजे. बीज प्रक्रियेसह कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने करावा. कोळेकर म्हणाले, की सुपीक मातीची धूप थांबविण्यासाठी मशागतीच्या तंत्रात बदल करावा लागेल. शून्य मशागत तंत्राच्या प्रसारावर भर द्यावा लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT