POCRA Project Amaravati : अमरावतीच्या ४५४ गावांना ‘पोकरा’ प्रकल्पाचा लाभ

Climate Resilient Farming : अमरावती जिल्ह्यातील ४५४ गावांचा त्यात समावेश आहे. त्यातील अचलपूर तालुक्याच्या ४९ गावांत ही योजना राबविण्यात येणार आहे.
POCRA 2.0
POCRAAgrowon
Published on
Updated on

Amravati News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात ‘पोकरा’चा दुसरा टप्पा राज्यातील २१ जिल्ह्यांतील ६९५९ गावात राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील ४५४ गावांचा त्यात समावेश आहे. त्यातील अचलपूर अचलपूर तालुक्याच्या ४९ गावांत ही योजना राबविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना बदलत्या हवामानात अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नाची जोखीम वाढतच चालली आहे. त्यासाठी ही ‘पोकरा’ची आखणी करण्यात आली असून यापूर्वी सन २०१७-१८ ते २०२३ २४ या पाच वर्षाच्या काळात ‘पोकरा’ प्रकल्प पहिल्या टप्प्यात राबविला गेला. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.

POCRA 2.0
POCRA Project : ‘पोकरा’तून साधणार शेती, शेतकरी समृद्धी

आता पुन्हा एकदा ‘पोकरा’च्या दुसऱ्या टप्प्यात चालू आर्थिक वर्षापासून २१ जिल्ह्यांतील ६९५९ गावे यात समाविष्ट करण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनाने नेमलेल्या समितीकडून सर्वेक्षण करण्यात आले असून ज्यामध्ये पाऊस, उत्पादकता, पाण्याची स्थिती, ग्रामस्थांची आर्थिक स्थिती, आदी समस्यांच्या निकषात कमी ठरलेल्या गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.

त्यात जिल्ह्यातील ४५४ गावे तर अचलपूर तालुक्यातील ४९ गावे अंतर्भूत असून या गावांमध्ये सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या ११ सदस्यीय समितीत सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहणार आहेत.

POCRA 2.0
POCRA Scheme: ‘पोकरा’च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी एक कोटींचा निधी

या समितीलाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मंजुरीचे अधिकार प्रदान असून शेतीविषयक नवीन संशोधन पाण्याचा काटेकोर वापर शेतीमधील कर्म नियंत्रण, कार्बन क्रेडिट सुविधा आदी बाबी तसेच भरडधान्य उत्पादन, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, संवर्धित व पुनरुजीवित हवामान शेती पद्धतीचा वापर करून पिकांची उत्पादकता वाढविणे या बाबींवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

मृदू व जलसंधारण, भूजल पुनर्भरण. जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन.

पाण्याचा कार्यक्षम वापर. फळबाग वृक्ष व बांबू लागवड. कृषी पूरक व्यवसाय. काढणी पश्चात व्यवस्थापन व कृषी मूल्य साखळीचे बळकटीकरण.

जैविक निविष्ठा तयार करणे, बियाणे व धान्य प्रक्रिया युनिट तयार करणे. पर्यावरण सुरक्षितता.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात अमरावती जिल्ह्यातील ४५४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार असल्याने शेती संबंधित शेतकऱ्यांच्या वैयक्तिक व सामूहिक गरजा पूर्ण करून शेती व शेतकरी समृद्ध करण्याचा त्यातून प्रयत्न केला जाणार आहे.
- राहुल सातपुते, जिल्हा कृषी अधिकारी अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com