Rural Development : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाल्यास देश विकास

Panchayat Raj Day : महात्मा गांधी यांनी खरा भारत हा ग्रामीण भागात वसतो असे सांगितले. त्यानुसार ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाल्यास भारताचा विकास होईल.
Rural Development
Rural Development Agrowon
Published on
Updated on

Nashik News : ‘‘महात्मा गांधी यांनी खरा भारत हा ग्रामीण भागात वसतो असे सांगितले. त्यानुसार ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाल्यास भारताचा विकास होईल. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाने ग्रामपंचायतीने दिलेल्या अधिकारांचा सकारात्मक वापर केल्यास लोकसहभागातून प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास होईल,’’ असे प्रतिपादन नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

ग्रामीण लोकशाहीचा पाया असलेल्या पंचायती राज व्यवस्थेच्या सन्मानार्थ २४ एप्रिल रोजी ‘राष्ट्रीय पंचायतराज दिवस’ जिल्हा परिषदेत उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मित्तल बोलत होत्या. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, सहायक गट विकास अधिकारी प्रशांत पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Rural Development
Rural Development: मान्याचीवाडीत ‘क्यूआर कोड’द्वारे शंभर टक्के कर भरणा

यंदाच्या वर्षी ‘पंचायत, सशक्त लोकशाहीचा पाया’ ही संकल्पना अधोरेखित करत नाशिक जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्हा परिषदेत पंचायतराजदिनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यांचे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त बिहार येथून प्रसारित होणारे विशेष संदेशाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याचबरोबर सेवा हक्क कायदा जनजागृती करण्यात आली.

Rural Development
Rural Development : भूमिहीन, अल्पभूधारकांचे जीवन झाले शाश्‍वत

संपूर्ण जिल्ह्यात पंचायतीराज दिवस उत्साहात साजरा करताना जिल्ह्यात विविध विकास कामांचे उद्‍घाटन, लाभार्थ्यांना योजना संबंधित मदतीचे वितरण, जलसंवर्धन, स्वच्छता अभियान, महिलांचे सशक्तीकरण, डिजिटल ग्रामपंचायत यांसारखे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांशी थेट संवाद साधून शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्यावर भर दिला गेला.

उत्कृष्ट कार्याची दखल घेत ग्रामपंचायतींचा सन्मान

राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यातून नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंप्री (ता.जि. नाशिक) ग्रामपंचायतीची निवड झाली होती. मोडाळे (ता. इगतपुरी) ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी तसेच आंदरसूल ग्रामपंचायतीने ‘ई-गव्हर्नन्स’ प्रकारात चांगले काम केल्याबद्दल ग्रामविकास व पंचायतराज सक्षमीकरणातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन मित्तल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी पिंप्री सैयदचे सरपंच भाऊसाहेब ढिकले व ग्रामपंचायत अधिकारी दौलत गांगुर्डे, मोडाळेचे सरपंच शिल्पा आहेर, ग्रामपंचायत अधिकारी हनुमान दराडे, अंदरसूलचे उपसरपंच रविंद्र वाकचौरे, ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बोराडे यावेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com