Parliament Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Session of Parliament: संसदेचे पावसाळी अधिवेशन विजयोत्सवाचे : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi: संसदेचे पावसाळी अधिवेशन हे राष्ट्रगौरव आणि विजयोत्सवाचे अधिवेशन आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान देशाने ऐक्याची ताकद आणि एक स्वराचे सामर्थ्य अनुभवले आहे.

Team Agrowon

New Delhi News: संसदेचे पावसाळी अधिवेशन हे राष्ट्रगौरव आणि विजयोत्सवाचे अधिवेशन आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान देशाने ऐक्याची ताकद आणि एक स्वराचे सामर्थ्य अनुभवले आहे.

विजयोत्सवाचे हे पर्व पावसाळी अधिवेशनात त्याच भावनेतून प्रकट होऊन देशाच्या सैन्यशक्तीची प्रशंसा आणि देशाच्या सामर्थ्याचे गौरवगान करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. २१) व्यक्त केला.

राजकीय पक्ष वेगवेगळे असले, त्यांचा अजेंडा आणि भूमिका स्वतंत्र असल्या आणि पक्षहितावरून मतभिन्नता असली तरी देशहितासाठी सर्वांची मने एकत्र यावीत, असे आवाहन त्यांनी केले.

बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुलासमोर आमच्या देशाची राज्यघटना विजयी होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या दहा वर्षांत शांती आणि प्रगती खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून देश दहशतवाद आणि नक्षलवादासारख्या अनेक प्रकारच्या हिंसक घटनांचा बळी ठरला.

पण आज नक्षलवाद आणि माओवादाचा परिघ वेगाने संकुचित होत आहे. देशातील शेकडो जिल्हे नक्षलवादापासून मुक्त होऊन मोकळा श्वास घेत आहेत. कालपर्यंत ज्या लाल मार्गिका होत्या, आज त्या हरित विकास क्षेत्रांमध्ये परिवर्तित होताना दिसत आहेत, असे ते म्हणाले

राज्यसभेत पाच सदस्यांचा शपथविधी

पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी सोमवारी राज्यसभेत बीरेंद्रप्रसाद बैश्य (आगप, आसाम), कणाद पुरकायस्थ (भाजप, आसाम), डॉ. मीनाक्षी जैन (नामनियुक्त दिल्ली), सी. सदानंदन मास्टर (नामनियुक्त, केरळ) आणि हर्षवर्धन श्रृंगला (नामनियुक्त, सिक्कीम) यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राष्ट्रपती नियुक्त चौथे सदस्य उज्ज्वल निकम मात्र अनुपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद; राजीनाम्याच्या मागणीला जोर

Khandesh Water Storage : भूगर्भातील पाणी उपसा घटला

Watermelon Farming : खरिपातील कलिंगडाची लागवड यंदा कमीच

MSP committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हमीभाव समितीच्या नियमित बैठका; केंद्रीय कृषिमंत्र्यांचे उत्तर

Agrowon Podcast: पपईच्या दरात सुधारणा; कारली-मका तेजीत, कोथिंबीर स्थिर, तर तूर मात्र मंदीत

SCROLL FOR NEXT