Turmeric Market  Agrowon
ॲग्रो विशेष

National Turmeric Board : पंतप्रधानांकडून राष्ट्रीय हळद मंडळाच्या स्थापनेची घोषणा ; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Turmeric Production : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथील जाहीर सभेतमध्ये राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली.

Swapnil Shinde

Value chain of turmeric : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणामध्ये सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचे नवीन प्रकल्पांचे लोकार्पण केले. तसेच काही महत्त्वाच्या योजनांचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना आणि तेलंगणामध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली.

महबूबनगर येथील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, आपला देश हळदीचा प्रमुख उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे. कोविड महामारीनंतर हळदीच्या फायद्यांबाबत जागरूकता वाढली आहे. जगभरात हळदीची मागणीही वाढली आहे. त्यामुळे आज, हळदीच्या उत्पादनापासून निर्यात आणि संशोधनापर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीकडे अधिक व्यावसायिक लक्ष देणे आवश्यक आहे; आणि या संदर्भात पुढाकार घेणे आवश्यक आहे.

“आज मी तेलंगणाच्या भूमीवरून हळद संबंधित एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करत आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजा आणि भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन केंद्राने राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याचा निर्णय आहे. राष्ट्रीय हळद मंडळ पुरवठा साखळीतील मूल्य-अ‍ॅडिशनपासून ते पायाभूत सुविधांशी संबंधित कामांपर्यंत विविध क्षेत्रात शेतकऱ्यांना मदत करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

भारतात जवळपास १.१ दशलक्ष टन हळदीचे उत्पादन होते, ते जागतिक उत्पादनाच्या ८० टक्के आहे. हळदीची निर्यात सध्या १.५ लाख टनांच्या आसपास आहे. कोवीड काळानंतर शिपमेंटने गती मिळाली आहे.

हिंगोली येथे हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासाठी खासदार हेमंत पाटील यांचा मागील अनेक दिवसांपासून केंद्र, राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यासाठी राज्य शासनाच्यावतीने अभ्यास समिती गठीत करण्यात आले होती. गेल्या काही वर्षांपासून हळद उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT