Man River S Agrowon
ॲग्रो विशेष

Man River : माणगंगा संस्थेकडून माण नदीपात्राची नांगरणी

Water Crisis : यापूर्वीही २०१५ मध्ये संस्थेने माण नदीपात्र नांगरले होते. परंतु त्या वेळी वाडेगाव बंधाऱ्यातील नदीपात्रात ८ ते १३ फूट उंचीचा गाळ होता.

Team Agrowon

Solapur News : ‘‘पावसाचे पाणी माण नदीपात्रातून जमिनीत मुरावे, पर्क्युलेशन वाढून आसपासच्या विहिरी-बोअरला पाणी वाढावे, या उद्देशाने माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणचे माण नदीपात्र नांगरणे किंवा मोठ्या ट्रॅक्टरने फणकाटी मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे,’’ अशी माहिती माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी दिली.

श्री. घोंगडे म्हणाले, ‘‘यापूर्वीही २०१५ मध्ये संस्थेने माण नदीपात्र नांगरले होते. परंतु त्या वेळी वाडेगाव बंधाऱ्यातील नदीपात्रात ८ ते १३ फूट उंचीचा गाळ होता. त्यामुळे त्या वेळची नांगरट फारशी उपयुक्त ठरली नव्हती. २०१६ व २०१७ या वर्षात माण नदीपात्रातील संपूर्ण गाळ काढण्यात आला. त्याखाली फक्त वाळूचे थर शिल्लक राहिले होते.

नंतरच्या चार-पाच वर्षांत पावसाच्या पाण्याने वाळूच्या थरावर गाळाचे थर साचले आहेत. त्यामुळे गाळ आणि वाळू मिश्रण झाले की सिमेंट काँक्रीटप्रमाणे घट्ट थर तयार होतात. त्यामुळे पावसाचे पाणी आले तरी ते वरच्यावर वाहून जाते. घट्ट थरामुळे जमिनीत पाणी मुरत नाही.

तसेच पर्क्यूलेशन पूर्णपणे बंद पडल्यामुळे आसपासच्या विहिरी-बोअरला नदीतून पाणी जात नाही. त्याकरिता नदीपात्रावरील पृष्ठभाग भुसभुशीत करून त्यावरील वाळू मातीचा घट्ट झालेला थर काढणे आवश्यक असल्याने नदीपात्र नांगरण्यास सुरवात केली आहे.’’

‘‘नदीपात्र नांगरण्याची तयारी गेल्या सहा महिन्यापासून केली जात असून, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना चार महिन्यापूर्वीच पत्राद्वारे कळविले आहे,’’ अशी माहितीही घोंगडे यांनी दिली.

मदतीसाठी आवाहन

‘‘‘शक्य असेल तिथे नदी नांगरा’ हा व्हॉट्सअॅप मेसेज आमच्या वैयक्तिक व ग्रुपवर टाकून अनेकांनी माहिती पुरविली. त्यातूनही आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. विनंती इतकीच आहे की नदी नांगरणी अभियान आम्ही सुरू करत आहोत.

त्यामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी संस्थेच्या संपर्क क्रमांक-९४२००९३५९९, ९४२३५६०९४५ या क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे,’’ असे आवाहन माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात येत आहे. या कामासाठी दिली जाणारी देणगी कर सवलत पात्र रक्कम असेल, अशी माहिती श्री. घोंगडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT