Sugarcane Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १ लाख ३७ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात गत वर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. त्यातच पाण्याची टंचाई त्यामुळे ऊस लागवडीला फटका बसणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पाणी कमी पाऊस आणि पाणी टंचाईचा फटका फारसा बसला नाही. सन २०२४-२५ गाळप हंगामासाठी १ लाख ३७ हजार १०३ हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार आहे. गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी १४१५ हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात गत वर्षी म्हणजे २०२३-२४ गाळप हंगामात १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टरवरील उसाचे गाळप करण्यात आले. जिल्ह्यात मागील वर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. त्यानंतर पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे याचा परिणाम आडसाली हंगामातील ऊस होणार असल्याची शक्यता होती. मात्र, या दरम्यान, कृष्णा आणि वारणा नदीला आणि विहीरी आणि कूपनलिका पुरेसे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला.

त्यामुळे यंदा गाळपास जाणाऱ्या आडसाली हंगामात गतवर्षीच्या तुलनेत १९४४ हेक्टरने वाढ झाली आहे. गत वर्षी पूर्व हंगामात उसाचे १९ हजार १६७ हेक्टर, तर सुरू हंगामात उसाचे १७ हजार ६६६ हेक्टर क्षेत्र होते. मुळात, दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि तासगाव या तालुक्यात पूर्व हंगाम आणि सुरु हंगामातील उसाची लागवड होते. वास्तविक पाहता या तालुक्यात पाणीटंचाई सप्टेंबर महिन्यापासून भासू लागली. त्यात परतीचा पाऊस अपुरा झाला.

यासाऱ्याचा फटका पूर्व हंगाम आणि सुरु हंगामातील ऊस लागवडीवर बसला आहे. आटपाडी, जत या दोन्ही तालुके दुष्काळी असून याभागात पूर्व हंगामी आणि सुरु हंगामातील उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. तसेच पाणीटंचाई असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी खोडवा पीक घेतले नाही.

वाळवा, मिरज आणि शिराळा तालुक्यांत पूर्व हंगाम, सुरू हंगामातील लागवडही केली जाते. तसेच खोडवा पीक ठेवण्यासाठी शेतकरी पुढाकार घेतात. मात्र, या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले असल्याने या हंगामातील उसाचे क्षेत्र कमी झाले आहे.

तालुकानिहाय गाळप हंगाम २०२४-२५ करिता उपलब्ध होणारा ऊस क्षेत्र (हेक्टरमध्ये) दृष्टीक्षेप

तालुका आडसाली पूर्वहंगामी सुरू खोडवा एकूण

मिरज ७२०१.८६ २९३४.३८ १५४४८.८३ १९७७.२०

तासगाव २८४६.१३ २०२५.२८ ७८३.७६ ४१३२.१० ९७८७.२७

पलूस ६०९९.७२ १८५४.१३ ९९६.४८ ६२९२.७९ १५२४३.१२

कडेगाव ८४३६.५३ २४७६.३३ २२५०.८० ९९२३.८४ २३०८७.५०

वाळवा १३८८४.८४ ३०१५.६५ २००२.१६ १२४५८.९७ ३१३६१.६२

शिराळा १८४३.३० २०१३.५६ २१७६.८१ ३१६४.४७ ९१९८.१४

खानापूर ५०९९.५४ २४६३.३२ १६८४.०५ ६५१६.०९ १५७६३.००

आटपाडी ४८७.५१ ४६३.५१ २२४.९० १३५७.१७ २५३३.०९

कवठेमहांकाळ ५१६.३५ ७९४.६३ १०३२.१६ २३७५.८६ ४७२२.००

जत ६४५.०० ६४४.०० २५०३.०० १८४६.०० ५६३८.००

एकूण ४७०६३.७८ १८३६४.७९ १५२०२.९५ ५६१५२.४४ १,३७,१०३.८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT