Orchard Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून फळबाग लागवडीला प्राधान्य दिले आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून फळबाग लागवडीला प्राधान्य दिले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १२३१ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून १०१६ हेक्टरवर पेरू, डाळिंब, आंबा, डाळिंब बागेची लागवड झाली आहे. १२३१ शेतकऱ्यांना ६ कोटी ८० लाखांचे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी अतिवृष्टी, परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी बदलत्या वातावरणात तग धरणाऱ्या पर्यायी आंबा, पेरू, यासह अन्य पीक लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे कृषी विभागानेही फळबाग लागवड क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत.

वास्तविक, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्व. भाऊसाहेब फुंडकर योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे. आटपाडीत डाळिंब, जत तालुक्यात पेरू, आंबा लागवड वाढली आहे. तर इतर तालुक्यांतही पेरू, आंब्यासह सीताफळ लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या योजनेसह महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही शेतकरी फळबाग लागवड करत आहेत. २०२३-२४ मध्ये ६९९ हेक्टरवर लागवड झाली.

तालुकानिहाय २०२३-२४ या वर्षात फळबाग लागवड दृष्टिक्षेप

तालुका शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टरमध्ये) वितरित अनुदान

मिरज २९ २४.७४ २४ लाख ५७ हजार

वाळवा २ १.१० १ लाख ४२ हजार

शिराळा ४ ७.०० १ लाख २८ हजार

तासगाव २३ १२.५५ ९ लाख १३ हजार

कडेगाव ७ ३.२० २ लाख ८५ हजार

खानापूर १५ ११.२३ ७ लाख १६ हजार

पलूस १ ०.२५ १८ हजार

आटपाडी ५३५ ५११.०९ ३ कोटी १८ लाख ७१ हजार

जत ४३८ ३१८.८५ २ कोटी ३ लाख ९८ हजार

कवठेमहांकाळ १७७ १२६.८१ १ कोटी १० लाख ९७ हजार

एकूण १२३१ १०१६.८२ ६ कोटी ८० लाख २५ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT