MGNREGA Labour : नगर जिल्ह्यात रोजगार हमी योजना कामांवर १७ हजार मजूर

Employment Guarantee Scheme : नगर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीची २ हजार ७२० कामे सुरू असून, या कामांवर १७ हजार ३३० मजूर काम करीत आहेत.
MGNREGA Labor
MGNREGA LaborAgrowon
Published on
Updated on

Nagar News : नगर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीची २ हजार ७२० कामे सुरू असून, या कामांवर १७ हजार ३३० मजूर काम करीत आहेत. या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २९ हजार ८९७ कामांचे प्रस्ताव तयार केले. या कामांवर ९३ लाख २८ हजार मजुरांना रोजगार देण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यात २०२३ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी जळून गेली. रब्बी हंगामातील पिकांना ही पावसाने ताण दिला होता. सध्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवरील मजुरांच्या रोजंदारी दरामध्ये वाढ केली आहे.

MGNREGA Labor
Labor Wages : ‘रोहयो’च्या १० हजार मजुरांची ३४ कोटींची मजुरी थकली

त्यानुसार या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार आता काम करणाऱ्या अकुशल मजुरांना २५३ रुपयांऐवजी २७३ रुपये मजुरी दिली जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायत, कृषी, वन, लघुपाटबंधारे, जलसंपदा आदी विभागांमार्फत केली जातात. ग्रामपंचायत व कृषी विभागाच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाची कामे घेतली जातात.

या सर्व कामांमध्ये कुशल म्हणजे यंत्राद्वारे केली जाणारे कामे व अकुशल म्हणजे मजुरांकडून केली जाणारी कामे यांचे प्रमाण ६०:४० ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजनेतील कामांचा दर वर्षी वार्षिक आराखडा तयार केला जातो.

MGNREGA Labor
Wells Allocation Corruption : मनरेगाच्या विहीर वाटपात भष्ट्राचाराचे ‘सिंचन’

वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये जनावरांचे, शेळ्यांचे गोठे बांधणे, शेततळे, बांधावर वृक्ष लागवड, फळबाग लागवड, नालाबांध आदी कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक कामांमध्ये मातीबांध, नालाबंडिंग, शाळांसाठी संरक्षक भिंत, पेव्हिंग ब्लॉक, सिमेंट बंधारे बांधणे आदी कामांचा समावेश केलेला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची संख्येत वाढ होणार असल्याचे दिसून येते.

तालुकानिहाय सुरू असलेली कामे (कंसात मजुरांची संख्या)

अकोले ११५ (५१०), जामखेड ८९९ (६ हजार २७८), कर्जत २८६ (१ हजार २९२), कोपरगाव १३६ (२८५), नगर १८६ (८९०), नेवासे ११० (४५३), पारनेर १४२ (१ हजार ४८४), पाथर्डी १०५ (७४९), राहाता ५२ (१९७), राहुरी ८८ (५१७), संगमनेर २५० (१ हजार ७२५), शेवगाव १९१ (१ हजार ६५८), श्रीगोंदे ११० (९७६), श्रीरामपूर ५० (३१६)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com