Fertilizer pm narendra modi agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : खतांच्या पोत्यांवर प्रधानमंत्री मोदींचा फोटो, आचारसंहितेचा शेतकऱ्यांना फटका बसणार?

Fertilizer Sales Code of Conduct : आचारसंहितेचा सर्वात मोठा फटका शेतीला बसण्याची शक्यता आहे. खत विक्री आचारसंहितेत अडकली आहे.

sandeep Shirguppe

Photo of PM Narendra Modi Fertilizer Bags : मागच्या दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली. दरम्यान या आचारसंहितेमुळे अनेक बंधणे लागू झाली आहेत. आचारसंहितेचा सर्वात मोठा फटका शेतीला बसण्याची शक्यता आहे. खत विक्री आचारसंहितेत अडकली आहे.

रासायनीक खते असलेल्या प्रत्येक गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असल्याने नेमके काय करावे, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. स्टिकर लावून छायाचित्र झाकायचे असेल तर संबंधित कंपन्यांनीच स्टिकर पुरवावीत, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जर हा खर्च विक्रेत्यांवर लादण्यात आल्यास विक्रेत्यांवर अतिरीक्त खर्चाचा विनाकारण भुर्दंड लागणार आहे.

केंद्र सरकारच्या खत विभागाने देशात 'भारत' या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिलेली आहे. त्यानुसार गेल्या वर्षीपासून कंपन्यांकडून 'भारत' नावाखाली खत पुरवठा होत आहे. खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही राजकीय व्यक्तीचे छायाचित्र अथवा मतदारांवर प्रभाव पडेल, असा मजकूर असल्यास त्यावर स्टिकर लावून ते झाकूनच संबंधित वस्तूची विक्री करण्याचा आदेश आयोगाने जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे.

त्यात खत गोण्यांचाही समावेश होत आहे. स्टिकर लावल्याचे आढळले नाही अथवा कोणाची तक्रार आली तर संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.

खत विक्रेत्यांकडे खतांचा हजारो टन साठा गोदामात आहे. उसाला मात्रा देण्यासाठी शेतकरी खतांची मागणी करीत आहेत. खताच्या गोण्यांवरील छायाचित्र झाकण्यासाठी दुकानदारांकडे स्टिकर उपलब्ध नाहीत. बाजारातून अशी स्टिकर विकत आणणे दुकानदारांना परवडत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. संबंधित कंपन्यांनी छायाचित्रांवर स्टिकर लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

रंग लावण्याचीही पंचाईत

खताच्या गोण्यांवरील पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्राला रंग लावायलाही दुकानदार धजत नाहीत. रंग लावून छायाचित्र झाकले तर त्याला वेगळाच 'रंग' येण्याची भीती असल्याने संबंधित कंपन्यांनीच विक्रेत्यांना स्टिकर पुरवावीत. विक्रेते ते गोण्यांवर लावून खत विक्री करतील किंवा निवडणूक आयोगाने पर्याय काढावा, अशी विनंती खत विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT