Sugarcane Farmers : मुख्यमंत्री साहेब आमचं काय चुकलं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक...

Viral VIdeo Kolhapur : साहेब आमचं काय चुकलं... अशा आशयाचा जोरदार व्हिडीओ व्हायरल होत आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeAgrowon

Sugarcane Farmers to CM Eknath Shinde : मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. यानंतर पेठ वडगाव पोलीस ठाण्याकडून काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

यादरम्यान पोलिसांनी या आंदोलकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे बोलले गेले. ऊस दर मागणाऱ्या शेतकऱ्यांना अमानूष मारहाण करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना आर्त हाक दिली आहे. साहेब माझं काय चुकलं... अशा आशयाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शेतकऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, मी हेरवाड तालुका शिरोळ येथील एक तरुण ऊस उत्पादक शेतकरी आहे. गतवर्षी माझा १८४ टन ऊस कारखान्याला गाळप झाला. हाडाची काढ आणि रक्ताची पाणी करून नैसर्गिक आपत्ती आसमानी व सुलतानी संकटे यांना तोंड देत आम्ही दिवस रात्र रानात राबलो. गेल्या वर्षीपासून साखर, इथेनॉल, बग्यास, मोलसिस या पदार्थांना चांगला दर मिळाला. यामुळे कारखान्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पैसे आले. शेतकऱ्यांना एफ.आर.पी देऊन कारखान्यांच्याकडे पैसे शिल्लक राहिले म्हणून आम्ही चारशे रुपयेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी तीन महिने कारखानदारांशी लढा उभारला.

पायाला फोड येईपर्यंत जखमा होईपर्यंत आम्ही पदयात्रा काढल्या. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग नऊ तास रोखून धरला. यानंतर आपण स्वतः या आंदोलनात मध्यस्थी केलात व आपल्या यशस्वी मध्यस्थीनंतर गतवर्षी तुटलेल्या ऊसाला शंभर रुपये दुसरा हप्ता देण्याचा तोडगा मान्य होऊन आंदोलन समाप्त झाले.

कारखानदारांनी दोन महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर रुपयाचा दुसरा हप्ता वर्ग करण्याची लेखी आदेश आपल्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी त्याप्रमाणे शंभर रुपयाचा दुसरा हप्ता देण्याचा प्रस्ताव आपल्या राज्य शासनाकडे सादर केला. जवळपास दोन महिने होऊन गेले आपल्याकडे या प्रस्तावांना मान्यता देण्यास वेळ नाही. या दोन महिन्यात तीन वेळा उपमुख्यमंत्र्यांना तीन वेळा तुम्हाला व चार वेळेला राज्याचे मुख्य सचिव यांना भेटून या प्रस्तावांना मान्यता देण्याची विनंती केली. मात्र आपल्याकडून याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही .

यामुळे संतापून मी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना काळे झेंडे दाखवले. यात आमचं काय चुकलं. आपण मात्र लगेचच काळ झेंडे दाखवलेली गोष्ट इतकी मनाला लागली की पोलिस यंत्रणेवर दबाव टाकत तुम्ही आम्हाला पोलीस कोठडी दिला. पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही माझ्या सहकाऱ्यांना काळे निळे होईपर्यंत मारहाण करण्यास भाग पाडले.

CM Eknath Shinde
Sugar Production : यंदा देशभरात साखरेचे उत्पादन वाढणार, इस्माकडून अंदाजे आकडेवारी जाहीर

स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे आपण मानसपुत्र म्हणून घेता मात्र ज्यावेळेस सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत असत तेव्हा आनंद दिघे साहेब त्यांना न्याय देऊनच थांबायचे. प्रसंगी त्यांनी पोलिसांनाही अंगावर घेऊन सामान्यांना न्याय दिला. आपण मात्र याच पदाचा गैरवापर करत शेतकऱ्यांना घामाचे दाम देणे ऐवजी त्यांच्यावर वर्मीघाव केले. ऑक्टोंबर २०२२ सालामध्ये आपण एक रकमी एफ.आर.पी देण्याचा कायदा पूर्ववत करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला मात्र आज अखेर कारखानदारांच्या दबावामुळे तुम्ही त्या फाईलवर सही करू शकला नाही.

राज्यातील कोट्यावधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे. शेतकऱ्यांच्या प्रति आंधळे प्रेम दाखवून आपण शेतकऱ्यांची फसवणूक करत आहात का असा सवाल कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com