Tamarind  Agrowon
ॲग्रो विशेष

Tamarind Pest : चिंचेवर पहिल्यांदाच आढळून आला अळीचा प्रादुर्भाव

Tamarind Crop : बांधावरील चिंच फळाच्या झाडावर यंदा पहिल्यांदाच अळीचा प्रार्दुभाव झाल्याचे दिसत आहे.

Team Agrowon

Latur News : बांधावरील चिंच फळाच्या झाडावर यंदा पहिल्यांदाच अळीचा प्रार्दुभाव झाल्याचे दिसत आहे. या अज्ञात काळ्या अळीमुळे चिंचेच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

शेतातील पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होतो. मात्र बांधावरच्या चिंचेवरही अळीने आपले बस्तान बसवल्याने इतर पिकांप्रमाणेच चिंचेची गत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिढ्यान् पिढ्याची चिंचवर ऐन फुलांच्या हंगामात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

पेरणीच्या हंगामात चिंच फुलांनी बहरते. या बहरावरच चालू हंगामासाठी व्यापारी चिंचेचे सौदे घेतात. फेब्रुवारीमध्ये चिंच काढणीला येत असली, तरी जूनमध्येच झाडांचे व्यवहार होतात. यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना चिंचेचा हातभार लागतो. चिंचेचे एक झाड दीड हजारापासून वीस हजारांपर्यंत उत्पन्न देते.

या व्यवहाराच्या तोंडावरच काळ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी व्यवहार करण्यासाठी धजत नसल्याची स्थिती आहे. हडोळती (ता. अहमदपूर) येथील शेतकरी गोविंद जोशी यांनी त्यांच्या शेतात दीडशे वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड असून, दरवर्षी हे झाड व्यापारी ३५ हजारांपर्यंत खरेदी करत होते. या वर्षी काळी अळी दिसल्याने व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नसल्याचे सांगितले. अळीमुळे फुलोरा गळत असल्याचे चिंच व्यापारी रज्जाकसाहेब शेख यांनी सांगितले.

चिंचेवर पहिल्यांदाच अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शास्त्रज्ञांना यासाठी प्रक्षेत्र भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. यावर उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल. जिल्ह्यात बांधावर व सलग शेतावरही चिंच लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. शास्त्रज्ञांच्या अहवालानंतर प्रशासनालाही माहिती देण्यात येईल.
- सुभाष चोले, जिल्हा कृषी अधिकारी, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Flood Crisis : आम्ही तुमच्या सोबत आहोत...

Heavy Rain Pune : पुणे जिल्ह्यात पंधरा मंडलांत अतिवृष्टी

Farmers Protest : कानगावात कपडे जाळून शासनाचा निषेध

Na. Dho. Mahanor : कवी महानोर यांचे शेतीसाठी मोलाचे कार्य

Crop Damage Survey : ढोल-डफ वाजवित केले अधिकाऱ्यांचे स्वागत

SCROLL FOR NEXT