Vilayati tamarind Processing : विलायती चिंचेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

Tamarind Processing : विलायती चिंचेची लागवड प्रामुख्याने राजस्थानमधील अजमेर, उदयपूर आणि माउंट अबू जिल्ह्यात आहे. फळांमधील गर लाल आणि पांढऱ्या रंगाचा असतो. बिया काळ्या रंगाच्या असतात.
Vilayati tamarind Processing
Vilayati tamarind Processing Agrowon

डॉ. सचिन मस्के, डॉ. सोनल झंवर

Food Processing :
विलायती चिंचेची लागवड प्रामुख्याने राजस्थानमधील अजमेर, उदयपूर आणि माउंट अबू जिल्ह्यात आहे. फळांमधील गर लाल आणि पांढऱ्या रंगाचा असतो. बिया काळ्या रंगाच्या असतात. या चिंचेला सामान्यतः पहाडी चिंच म्हणून ओळखले जाते. हे झाड सदाहरित असून, वीस मीटर उंचीपर्यंत वाढते. प्रत्येक शेंगेमध्ये सुमारे दहा बिया असतात. विलायती चिंचेमध्ये आवश्यक पोषक तत्त्वेदेखील असतात. हे फळ अतिसारावर उपचार, दात मजबुतीकरण आणि मधुमेह असलेल्यांमध्ये रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. विलायती चिंचेमध्ये ऊर्जेची गरज, भूक नियंत्रण आणि शरीरातील अन्नाचे पचन सुधारण्यासाठी कॅलरी, प्रथिने, जटिल कर्बोदके आणि आहारातील तंतू असतात. कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जीवनसत्त्व क आणि ब उपलब्ध आहे. याचबरोबरीने अँटिऑक्सिडन्ट, फिनोलिक संयुगे, फ्लेव्होनॉइड्स आणि क्वेरसेटीन उपलब्ध आहे. यामध्ये प्रथिने, सॅपोनिन्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनॉलसारखी फायटोकेमिकल्स उपलब्ध आहेत.

पौष्टिक घटक ः
१) कर्बोदके ः ७६.८७ ग्रॅम
२) प्रथिने ः १२.४ ग्रॅम
३) तंतुमय घटक ः १.३ ग्रॅम
४) चरबी ः ०.२४ ग्रॅम
५) पोटॅशिअम ः ०.२ ग्रॅम
६) फॉस्फरस ः ०.०४ ग्रॅम
७) कॅल्शिअम ः ०.०१ ग्रॅम
८) लोह ः ०.००५ ग्रॅम

Vilayati tamarind Processing
Leenseed Food Processing : जवसाचे प्रक्रियायुक्त पदार्थ

प्रक्रियायुक्त पदार्थ
१) ताजी फळे ः ताज्या फळांमध्ये थोडी साखर आणि मीठ मिसळून खाता येते.
२) वाळलेली फळे : वाळलेल्या फळांची पावडर बनवतात. गोड आणि चवदार पदार्थांसाठी चव म्हणून वापरतात. पावडर पाण्यात भिजवून नंतर पेस्ट बनवतात.
३) पेय : वाळलेल्या शेंगा रात्रभर पाण्यात भिजवून गोड चिंचेचे पेय बनवता येते. यामध्ये थोडी साखर मिसळावी लागते.
४) चटणी : भिजवलेल्या चिंचेमध्ये गूळ मिसळून त्यामध्ये आले, हिरवी मिरची, मीठ मिसळावे.
५) करी : पदार्थाला तिखट चव येण्यासाठी वेगवेगळ्या करीमध्ये चिंचेची पेस्ट वापरली जाऊ शकते.
६) मिठाई : चिंचेची पेस्ट आइस्क्रीम, जॅम इत्यादी विविध मिठाईमध्ये वापरली जाते.

हाताळणी आणि साठवणूक ः
१) काढणी : फळे पिकल्यावर काढणी करावी. शेंगांवर पिवळसर छटा येते. नुकसान टाळण्यासाठी फळांची काळजीपूर्वक काढणी करावी.
२) हाताळणी : पिकलेली फळांना जखम टाळण्यासाठी काळजीपूर्वक हाताळणी करावी. कारण फळे वाहतूक किंवा साठवणुकीदरम्यान खराब होऊ शकतात.
३) साठवणूक : पिकलेली चिंच थंड, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावी. थेट सूर्यप्रकाशाचा संपर्क टाळावा. फळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावीत.
४) पॅकेजिंग : छिद्रयुक्त प्लॅस्टिक पिशव्या किंवा एअर व्हेंट्स असलेले कंटेनर वापरावेत. यामुळे हवेचा प्रवाह योग्य प्रकारे होऊ शकेल. जखम टाळण्यासाठी फळे खूप घट्ट बांधणे टाळावीत. पिकलेली चिंच योग्य परिस्थितीत काही दिवस साठवता येते. पौष्टिक फायद्यासाठी ताजी चिच खाणे फायदेशीर ठरते.

संपर्क ः डॉ. सचिन मस्के, ९०४९९६७२५७
(एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com