Tamarind Rate : नगरमध्ये चिंचेची आवक आणि दरातही घसरले

Tamarind Arrival : सध्या नगरला दररोज साधारण सहाशे क्विंटलपर्यंत चिंचेची आवक होत असून प्रतिक्विंटल सात ते आठ हजार रुपये व सरासरी साडेसात हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
Tamarind Rate
Tamarind RateAgrowon

Nagar News : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत अलीकडच्या पंधरा दिवसांपासून चिंचेच्या आवकेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शिवाय दरही कमी झाले आहेत. सध्या नगरला दररोज साधारण सहाशे क्विंटलपर्यंत चिंचेची आवक होत असून प्रतिक्विंटल सात ते आठ हजार रुपये व सरासरी साडेसात हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर येथील बाजार समितीत नगर जिल्ह्यासह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर भागातून मोठ्या प्रमाणात चिंचेची आवक होत असते. साधारण महिनाभरापूर्वी येथे दररोज दीड हजार क्विंटलपर्यंत चिंचेची दर दिवसाला आवक होत होती.

Tamarind Rate
Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

दरही साधारण प्रति क्विंटलला १२ हजार रुपयांपर्यंत मिळत होता. सध्या मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून चिंचेची आवक आणि दरही कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Tamarind Rate
Vilayati tamarind Processing : विलायती चिंचेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

सध्या दर दिवसाला फोडलेल्या चिंचेची ६०० क्विंटलपर्यंत आवक होत असून ७००० ते ८००० रुपये व सरासरी ७५०० रुपयांचा दर मिळत आहे. अखंड चिंचेच्या व साधारण सात क्विंटलपर्यंत आवक होत असून २१०० ते २२०० व सरासरी २१५० रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. तर चिंच बोटकाची ११० क्विंटलपर्यंत आवक होत असून ३००० ते ३२०० व सरासरी ३१०० रुपयांचा दर मिळत आहे.

पंधरा दिवसांपासून चिंचोक्याची आवकही कमी झाली आहे. साधारण दर दिवसाला ३०० क्विंटलपर्यंत होणारी चिंचोक्याची आवक सध्या दर दिवसाला दीडशे ते पावणे दोनशे क्विंटलपर्यंत आली आहे. ३००० ते ३२०० व सरासरी ३१०० रुपयांचा दर मिळत आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com