Tur Pest Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Pest Disease Management : तुरीवरील कीड-रोग नियंत्रण

Tur Crop Protection : तूर पिकामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी या किडींचा, तर मर रोग, कोरडी मूळकुज, फायटोप्थोरा करपा रोग आणि वांझ रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

डॉ. किरण जाधव, डॉ. ज्ञानदेव मुटकुळे, डॉ. प्रशांत सोनटक्के

Tur Crop Management : तूर पिकामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी या किडींचा, तर मर रोग, कोरडी मूळकुज, फायटोप्थोरा करपा रोग आणि वांझ रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वाढीच्या अवस्थेतील पिकांमध्ये या कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे प्रादुर्भाव ओळखून वेळीच उपाययोजनांचा अवलंब करावा.

कीड नियंत्रण ः

१) शेंगा पोखरणारी अळी ः

- या अळीला घाटे अळी असेही म्हणतात.

- ही बहुभक्षी कीड असून तूर पिकाशिवाय कापूस, हरभरा, सोयाबीन, मूग, वाटाणा, उडीद, मका, ज्वारी, टोमॅटो इ. पिकांवर उपजीविका करते.

- अळी सुरुवातीला कोवळी पाने खाते.

- फुलोऱ्याच्या अवस्थेतील पिकामध्ये कळ्यांवर उपजीविका करते.

- शेंगा लागल्यावर अळी शेंगांना छिद्र करते. अर्धे शरीर बाहेर आणि अर्धे आत याप्रमाणे ठेवून अळी आतील दाणे खाते.

- अळी सुरुवातीला कळ्या आणि फुले खाते. त्यामुळे शेंगा लागण्याचे प्रमाण कमी होते.

नियंत्रण ः

- तुरीसोबत ज्वारी, मका, बाजरी किंवा सोयाबीन या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी.

- बांधावरील पर्यायी पिके, जसे की कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.

- पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.

- शेतात हेक्टरी ५० ते ६० पक्षिथांबे उभारावेत.

- पीक कळी अवस्थेत आल्यानंतर हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.

- तुरीच्या झाडाखाली पोती टाकून झाड हलवावे. आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.

- अळी लहान असताना एचएएनपीव्ही (लहान अवस्थेत) २ मिलि प्रमाणे सायंकाळी फवारणी करावी.

२) पिसारी पतंग ः

- पावसाळा संपल्यावर प्रादुर्भाव वाढतो.

- अळ्या सुरुवातीला कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडून दाणे खातात.

- पूर्ण वाढलेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरवडून खाते. नंतर बाहेर राहून आतील दाण्यावर उपजीविका करते.

व्यवस्थापन ः

- हेक्टरी ५० ते ६० पक्षिथांबे उभारावेत.

३) शेंगमाशी ः

- सुरुवातीला शेंगमाशीच्या प्रादुर्भावाचे कोणतेही लक्षण शेंगावर दिसत नाही. परंतु वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते. त्या छिद्रातून मासी बाहेर पडते. तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो.

- अळी शेंगामध्ये प्रवेश करून अर्धवट दाणे खाते. तसेच दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात. त्यामुळे दाण्यावर बुरशीची वाढ होऊन दाणे कुजतात.

४) पाने व फुले जाळी करणारी अळी ः

- अळी पाने, फुले, कळ्या व शेंगा यांचा एकत्र गुच्छ करून त्यात लपून उदरनिर्वाह करते.

- कोवळे शेंडे, पाने एकमेकांना चिकटल्याने खोडाची वाढ खुंटते.

- अळी पानांची गुंडाळी करून पाने पोखरते. त्यामुळे पानांची अन्ननिर्मिती करण्यात अडथळा येतो.

कीड व्यवस्थापन ः

शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी

करणारी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी,

(फवारणी ः प्रति १० लिटर पाणी)(हाय व्हॉल्यूम पंपासाठी)

- निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा

- ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५० मिलि किंवा

- इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ४.४ मिलि किंवा

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) २ ते ३ मिलि

(लेबलक्लेम आहेत.)

रोग नियंत्रण ः

१) मर रोग ः

- फ्युजॅरिअम ऑक्झिस्पोरम फॉरमा स्पेसीज उडम या बुरशीमुळे होतो.

- पिकाच्या मुळातील जल नलिका रोगाच्या प्रादुर्भावामुळे तपकिरी काळसर पडते.

- पाने पिवळसर पडून झाड वाळते.

- रोप तसेच फुलोरा ते शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून येतो.

२) कोरडी मूळकुज ः

- हा रोग रायझोक्टोनिया बटाटीकोला किंवा मायक्रोफोमीना या बुरशीमुळे होतो.

- अनियमित पाऊस, अवर्षण तसेच दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येतो.

- मुळे कोरडी व शुष्क होऊन कुजतात. परिणामी, मूळ कुजून झाड वाळते.

- प्रादुर्भावग्रस्त झाड उपटण्याचा प्रयत्न केल्यास, मुळे जमिनीत तशीच राहून वरील भाग हातात येतो.

व्यवस्थापन ः

मर रोग आणि कोरडी मूळकुज रोगाच्या व्यवस्थापनासाठी

- पिकांची फेरपालट करावी.

- लागवडीसाठी रोगप्रतिकारक वाणांची निवड करावी.

- रोगाची लक्षणे दिसताच,

ट्रायकोडर्मा २० ग्रॅम किंवा

बायोमिक्स (विद्यापीठ निर्मित उत्पादन) २० ग्रॅम किंवा

प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

२) फायटोप्थोरा करपा रोग ः

- रोप अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पाने व देठ करपतात.

- शाखीय वाढीच्या अवस्थेत उशिरा येणाऱ्या फायटोप्थोरा ब्लाइटमुळे खोडावर लंबगोलाकार टोकाकडे निमुळते झालेले राखेरी चट्टे पडतात.

- नंतर त्या जागी खात पडून खोडाचा भाग फुगतो.

- फांद्या व खोडावर प्रादुर्भाव झाल्यास, डिंकासारखा चिकट पदार्थ स्रवतो.

- खोड फांद्या तपकिरी होऊन करपतात.

व्यवस्थापन (आळवणी ः प्रतिलिटर पाणी)

- ट्रायकोडर्मा २० ग्रॅम किंवा

- बायोमिक्स (विद्यापीठ निर्मित उत्पादन) २० ग्रॅम किंवा

मेटीराम (५५ टक्के) अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन (५ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम

३) वांझ रोग ः

- हा विषाणूजन्य रोग पीजन पी स्टरीलिटी मोझॅक या विषाणूमुळे होतो.

- रोगाचा प्रसार एरिओफाइड माइट या कोळी किडीमुळे होतो.

- पानांवर गोलाकार पिवळे ठिपके, पिवळसर हिरवट चट्टे पडतात.

- झाडाची वाढ खुंटते.

- रोगग्रस्त झाडांना फुले व फळे लागत नाहीत.

व्यवस्थापन ः

- रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

- गंधक २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

- डॉ. ज्ञानदेव मुटकुळे, ९४२१७ १९३९२

- डॉ. प्रशांत सोनटक्के, ७५८८०८२१४३

(डॉ. जाधव हे प्रभारी अधिकारी, डॉ. मुटकुळे हे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ, तर

डॉ. सोनटक्के हे वनस्पती रोग शास्त्रज्ञ म्हणून कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथे कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT