Tur Pest Management : तूर पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणारा किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. यातून पिकावर वेळोवेळी अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
Tur Pest Management
Tur Pest Management Agrowon

उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणारा किडींचा प्रादुर्भाव (Pest Attack) हे मुख्य कारण आहे. यातून पिकावर वेळोवेळी अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. साठवणुकीमध्येही अनेक किडी तुरीवर स्वतःचे पोषण करतात. परंतु फुले व शेंगावर होणाऱ्या किडींचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरते. कधी कधी जास्त प्रमाणात कीड आल्यास ७० टक्क्यांपेक्षा ही अधिक नुकसान शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून होते. तूर पिकावरील मुख्यतः हिरवी घाटे अळी, पिसारी पतंगाची अळी व शेंगा वरील माशीची अळी अशा तीन प्रकारच्या शेंगा पोखरणाऱ्या किडी आढळतात. या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आणि एकात्मिक उपाययोजनांविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देलेली माहिती पाहुया.

Tur Pest Management
Tur Pest Management : तुरीवरील किडींचे एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन

तुरीचे पीक कळी अवस्थेत आल्यावर शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव  होत असतो. त्यामुळे तूर पिकाच्या शेंगा धरण्याच्या अवस्थेपासूनच या किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

शेंगा पोखरणारी हिरवी अळी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरण असल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. मोठ्या अळ्या शेंगांना छीद्र करून आतील दाणे पोखरुन खातात. 

Tur Pest Management
Pest Management : पाटील यांच्या नावीन्यपूर्ण कीटक सापळ्यास पेटंट

पिसारी पतंग 

पिसारी पतंगाची अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे खाते. त्यामुळे दाण्याची मुकानी होते. 

पाने गुंडाळणारी मरुका अळी 

अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगाला एकत्रित करून जाळ्याने चिकटून झुपके तयार करून पिकाचे नुकसान करते. 

एकात्मिक व्यवस्थापन कसे कराल?

या चारही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरिता खालील प्रमाणे उपाययोजना कराव्यात. 

- प्रति हेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत. 

- पहिली फवारणी पीक ५० % फुलोरा अवस्थेत असताना करावी. यामध्ये निंबोळी अर्क ५ % किंवा अॅझाडीरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अॅझाडीरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली किंवा एच. ए. एन. पी. व्ही. (५०० एल.) इ. प्रती हेक्टरी किंवा बॅसीलस थुरीन्जेनेसीस १५ मिली किंवा क्विनॉलफॉस (२५ इसी) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

दुसरी फवारणी म्हणजेच पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के एसजी) ग्रॅम किंवा लांम्बडासायहॅलोथ्रीन ( ५ टक्के प्रवाही) १० मिली किंवा क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ % एस सी प्रवाही) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील व त्या गोळ्या करून नष्ट कराव्यात. 

पाने गुंडाळणाऱ्या मरूका अळीच्या नियंत्रणासाठी फ्लू-बेंडामाईड २० डब्ल्यू जी ६ ग्रॅम किंवा नोवालूरॉन ५.२५ अधिक इंडॉक्झाकार्ब (४.५० एससी) १६ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com