District Bank Agrowon
ॲग्रो विशेष

District Co-Operative Bank : नियमित कर्ज फेडा; शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्या

District Bank Loan Update : शेतकऱ्यांना दिलेले कर्ज वेळेत परतफेड करावे. तसे केले नाही, तर हे कर्ज थकबाकीत जाईल. वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाच शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बॅंकेकडून करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्हा बॅंकेच्या वतीने सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेले कर्ज वेळेत परतफेड करावे. तसे केले नाही, तर हे कर्ज थकबाकीत जाईल. वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाच शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बॅंकेकडून करण्यात आले आहे.

बॅंकेच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, वेळेत कर्जफेड केले नाही, तर थकबाकीचा व्याजदर लागू होईल. पर्यायाने शेतकरी व सेवा संस्थांही अडचणीत येतील. खरीप कर्जाची वसुली सभासदांनी स्वेच्छेने केल्यास ती स्वीकारली जाईल. अशा सभासदांना शासनाच्या शून्य व्याजदर सवलतीचा लाभ होईल.

पुढील खरीप हंगामासाठी सवलतीच्या व्याजदरात नव्याने पीक कर्ज उपलब्ध होईल. ‘‘सरकारने सहकारी कर्जाच्या व्याजासह पुनर्गठन करणे व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळाची सभा झाली. शासन निर्णयानुसार शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती दिली होती.

मात्र आता त्यासंदर्भात शासनाच्या निर्णयाला अनुसरून महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधकांनी परिपत्रकाद्वारे कर्ज वसुली व कर्जाच्या पुनर्गठनाबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. दरम्यान, नव्याने आलेल्या सूचनांनुसार एक एप्रिल २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या दरम्यान कर्जवितरण झाले आहे. अशाच कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे,’’ असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

..या कर्जवसुलीला नाही स्थगिती

सहकार आयुक्तांच्या परिपत्रकानुसार खरीप कर्जाच्या व्याख्येत ऊस पीककर्ज, पशुपालन खेळते भांडवली कर्ज, मध्यम मुदत व दीर्घमुदत कर्ज पात्र नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT