Kharif Crop Loan : सिंधुदुर्गात खरिपासाठी २०२ कोटींचे कर्ज वितरण

Kharif Season 2023 : खरीप हंगाम २०२३ साठी जिल्ह्यातील २६ हजार ५७५ शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे २०२ कोटी ८२ लाख ५ हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : खरीप हंगाम २०२३ साठी जिल्ह्यातील २६ हजार ५७५ शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे २०२ कोटी ८२ लाख ५ हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. सर्वाधिक १०३ कोटी ८ लाख ३० हजार रुपये कर्जवितरण जिल्हा बँकेने केले आहे.

Crop Loan
Crop Loan : खरिपासाठी मुदतीत पीककर्जाचे वितरण करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर लागवड केली जाते. यामध्ये भातपीक, नाचणी यासह विविध प्रकारची फळझाडेदेखील लागवड केली जातात. त्यामुळे खरीप हंगामात कर्जाचे वितरण केले जाते. यावर्षी प्रशासनाकडून विविध बँकांना शेतकऱ्यांना ४०० कोटी अल्प मुदत कर्जाचे उद्दिष्ट दिले होते.

Crop Loan
Crop Loan : यवतमाळमध्ये शेतकरी कर्जापासून वंचित ; ठाकरे गटाचे आंदोलन

मात्र प्रत्यक्षात २६ हजार ५७५ शेतकऱ्यांना २०२ कोटी ८२ लाख ५ हजारांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. दिलेल्या उद्दिष्टांच्या ५० टक्के कर्जाचे वितरण बँकांनी केले आहे. सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा बँकेने केले असून या बँकेने शेतकऱ्यांना १०३ कोटी ८ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.

या बँकेकडील शेतकऱ्यांची संख्यादेखील मोठी असून १९ हजार ५४० शेतकऱ्यांना बँकेने हे कर्ज वितरण केले. राष्ट्रीय व खासगी बँकांना २२६ कोटी ६५ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. परंतु या बँकांनी अवघे ८४ कोटी ३ लाखांचे वितरण केले. ग्रामीण बँकांना ३२ कोटींचे उद्दिष्ट होते, या बँकांनी १५ कोटी ७० लाखांचे कर्ज दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com