Crop Loan : खरीप हंगामात ९४ टक्के पीककर्ज वाटप

Kharif Season Crop Loan : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ९४ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. या कर्जवितरणात जिल्हा बँकेने तब्बल १०२ टक्के कर्ज वितरित केले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ९४ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. या कर्जवितरणात जिल्हा बँकेने तब्बल १०२ टक्के कर्ज वितरित केले आहे. त्याच वेळी खासगी बँकांनी मात्र हात आखडता ठेवत एकूण लक्ष्यांकाच्या तुलनेत केवळ ४४ टक्के वितरण केले आहे.

खरीप हंगामात १५०० कोटी रुपयांच्या कर्जवितरणाचे लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले होते. १ एप्रिलपासून कर्जवितरणास प्रारंभ झाला व ३० सप्टेंबरला वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण लक्ष्यांकाच्या तुलनेत १४०५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून, त्याचे प्रमाण सरासरी ९४ टक्के आहे. राष्ट्रीय, खासगी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जवितरण करण्यात आले.

Crop Loan
Crop Loan : कर्जावरील व्याज आकारणी योग्य झाली आहे का?

कर्जवितरणात नेहमीप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली. ही बँक रब्बी हंगामात कर्जवाटप करीत नसल्याने खरीप हंगामापुरतेच उद्दिष्ट निश्‍चित करते. यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेस ५७० कोटी रुपयांचे लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या तुलनेत बँकेने ५८० कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. सरासरीने त्याचे प्रमाण १०२ टक्के आहे.

Crop Loan
Crop Loan : ‘रब्बी’त साडेबारशे कोटींवर पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट

राष्ट्रीय बँकांनी ९४ टक्के कर्ज वितरित केले असून, त्यांना ८१६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत या बँकांनी ७६५ .८६ कोटी रुपये कर्ज दिले, तर खासगी क्षेत्रातील बँकांनी मात्र कर्जवाटपात नेहमीप्रमाणे हात आखडता ठेवला आहे.

खासगी बँकांना ९३.०५ कोटी रुपयांचे लक्ष्यांक होते, त्यांनी ४१.०२ कोटी रुपयांचे म्हणजे ४४ टक्के कर्ज वितरित केले आहे. ग्रामीण बँकेने ९९ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ४०० शेतकऱ्यांना कर्ज वितरणाचे लक्ष्यांक होते. त्यापैकी १२११३१ शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. आता ३० सप्टेंबरपासून कर्ज वितरण बंद झाले असून रब्बी हंगामासाठी तयारी सुरू झाली आहे.

कर्ज वितरणाची स्थिती (रुपये कोटींत)

बँक लक्ष्यांक वितरण टक्के

राष्ट्रीय बँक ८१६.९५ ७६५.८६ ९४

खासगी बॅंक ९३.०५ ४१.०२ ४४

ग्रामीण बँक २०.०० १९.८७ ९९

जिल्हा मध्यवर्ती ५७० ५८० १०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com