Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा अर्जासाठी एकच रुपया द्या; सीएससी केंद्रांनी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

Agriculture Department : शेतकऱ्यांनीही १ रुपयांपेक्षा जास्त देऊ नये, जास्त पैशांची मागणी होत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.

Anil Jadhao 

Pune News : पीकविमा योजना सध्या चांगलीच गाजत आहे. शासनाने शेतकऱ्यांना १ रुपयात पीकविमा दिला असताना अर्जासाठी शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेण्याच्या तक्रारी येत आहेत. हा विषय सध्या माध्यमांमध्येही चांगलाच गाजत आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने कारवाई तंबी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांनीही १ रुपयांपेक्षा जास्त देऊ नये, जास्त पैशांची मागणी होत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. 

राज्यभरात सध्या पीकविमा योनजेत शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी आहे. शासन वारंवार शेतकऱ्यांकडून विमा अर्जासाठी केवळ १ रुपयाच घ्यावा, असे सांगत आहे. मात्र सीएससी केंद्रचालक अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी १०० ते २०० रुपये घेत असल्याचे शेतकरी सांगतात. माध्यमांनीही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला. त्यामुळे कृषी आयुक्तालयानेही हा मुद्दा गांभीर्याने घेत सीएससी केंद्रांना कारवाईचा इशारा देत शेतकऱ्यांना असे प्रकार आढळत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. 

कृषी आयुक्तालयाने म्हटले आही की, राज्यात काही ठिकाणी काही सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्याकडून प्रति अर्ज रुपये एक पेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत अशा प्रकारची घटना घडत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सीएससी प्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन कडक कारवाई केली जाईल.

सरकारने पीक विमा योजनेचा विस्तार वाढावा यासाठी मागील वर्षापासून महत्वाचा निर्णय घेतला. पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला. गेल्या वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी १ कोटी ७० लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. चालू खरीपात म्हणजेच २०२४ मध्ये ३० जून पर्यंत ४० लाख विमा अर्ज नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Farming : दोन हजारांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधीची उड्डाणे

Rabi Weed Management : रब्बी पिकातील तण व्यवस्थापन

Soybean Procurement : केंद्राचा सोयाबीन ओलाव्याबाबतचा नियम बासनात, नियम लागू करावा; संचालक गुंदेकर यांची मागणी

Jaggery Rate Kolhapur : कर्नाटकच्या गुळाची कोल्हापूर ब्रँडने विक्री; संतप्त शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद

Mushroom Farming : अळिंबी संशोधन प्रकल्पातून घडताहेत उद्योजक

SCROLL FOR NEXT