Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत पावणेदोन लाख शेतकऱ्यांचा सहभाग

Participation of Farmers : तेरा दिवसांत पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला असून, १ लाख २ हजार हेक्टरवरील पिकांचा आतापर्यंत विमा उतरवला आहे.
Crop Insurance Scheme
Crop Insurance SchemeAgrowon

Nagar News : खरिपातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी सुरू असलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेला नगर जिल्ह्यात यंदा फारसा प्रतिसाद दिसत नाही. तेरा दिवसांत पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला असून, १ लाख २ हजार हेक्टरवरील पिकांचा आतापर्यंत विमा उतरवला आहे. १५ जुलै अंतिम तारीख असल्याने सहभागी शेतकऱ्यांच्या शेवटच्या टप्प्यात संख्या वाढेल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी (२०२३-२४) वर्षी खरिपात ११ लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

खरिपात पिकांचे अतिपाऊस, पावसात खंड, काढणीपश्‍चात नुकसान अथवा पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान व उत्पादनात घट यातून नुकसान झाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक रुपया विमा हप्ता आहे. गेल्या वर्षीपासून एक रुपया विमा हप्ता असल्याने सहभागी शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. यंदा १५ जूनपासून ही योजना सुरू आहे. १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना विमा हप्ता भरता येणार आहे.

Crop Insurance Scheme
Crop Insurance : एक रुपयाच्या पीकविम्यासाठी शेतकऱ्यांकडून १०० रुपयांची वसुली ; कृषिमंत्र्यांकडून गंभीर दखल

नगर जिल्ह्यात खरिपात प्रामुख्याने भात, बाजरी, मका, तूर, मूग उडीद, सोयाबीन, कापूस, भुईमूग आदी पिके घेतली जात आहे. शासनाने यंदा भात पिकांसाठी ८, बाजरीसाठी १०१, भुईमुगासाठी ९०, सोयाबीनसाठी ७५, मुगासाठी ६३, उडदासाठी १५, तुरीसाठी ७९, कापसासाठी ६५ महसूल मंडले अधिसूचित केले असून, त्या मंडलांतील शेतकऱ्यांना त्या पिकांचा विमा भरता येणार आहे.

Crop Insurance Scheme
Crop Insurance Scheme : पीकविमा योजना हवी अधिक कार्यक्षम अन् पारदर्शी

यंदा विमा योजना सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आला आहे. मात्र गेल्या वर्षीचा विचार केला तर यंदा फारसा प्रतिसाद नाही. यंदा पीकविम्याबाबत फारसी प्रसिद्धी झाली नसल्याचे दिसत आहे. १५ जुलै अंतिम तारीख असल्याने सहभागी शेतकऱ्यांच्या शेवटच्या टप्प्यात संख्या वाढेल असे अंदाज आहे. गेल्या वर्षी (२०२३-२४) खरिपात ११ लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्या तेवढा सहभाग होईल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

नगर जिल्ह्यात २८ जूनपर्यंतची स्थिती

सहभागी शेतकरी : १,८०,०८७

हेक्टर क्षेत्र : १,०२, ०१८

शेतकरी हप्ता : १,८०,०८७

राज्य शासनाचा हप्ता हिस्सा : ४४,१६,६९,०४२

केंद्र शासनाचा हप्ता हिस्सा : २८,२०,९६,२५२

विमा संरक्षित रक्कम : ५३३ कोटी ०६ लाख, ३३ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com