Bribery Arrest Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Bribery Case : नायब तहसीलदार बळीराम चव्हाण लाचप्रकरणात अटकेत

Bribe Arrest : तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कायम खुणा करून देण्यासाठी नायब तहसीलदार चव्हाण यांच्याकडे विनंती केली होती.

Team Agrowon

Akola News : पातूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना गुरुवारी (ता. १९) सायंकाळी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने लाच मागितल्याप्रकरणी अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कायम खुणा करून देण्यासाठी नायब तहसीलदार चव्हाण यांच्याकडे विनंती केली होती. या कामासाठी त्याला चव्हाण यांच्यामार्फत चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार हा अल्पभूधारक असून, हलाखीच्या परिस्थितीत शेतमजुरी करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना त्यामध्ये तथ्य आढळून आले. त्यानुसार गुरुवारी सापळा रचण्यात आला होता.

मात्र, लाच स्वीकारताना चव्हाण याला संशय आला आणि त्याने रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. तरीसुद्धा लाच मागणीचे पुरावे भक्कम असल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात अजून एक जणाचा समावेश असून तो सध्या फरारी आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, राहुल इंगळे, अभय बावस्कर, संदीप तळे, किशोर पवार, नीलेश शेगोकार, असलम शहा व चालक नफीस यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Aerogel: खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारा एअरोजेल विकसित

Cotton Farming: जमिनीची ताकद वाढवून कापूस उत्पादनवाढ

Indian Language: भाषा मरता देशही मरतो...

Cow Protection Chaos: गोरक्षकांचा धुडगूस शेतकऱ्यांच्या मुळावर

Shirala Nagpanchami: शिराळ्यात २३ वर्षांनंतर पुन्हा झाले जीवंत नागदर्शन

SCROLL FOR NEXT