Parner APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Parner APMC : पारनेर बाजार समितीस दोन कोटींचा नफा

APMC Update : गेल्या आर्थिक वर्षात बाजार समिती आवारात पंधरा लाख ३० हजार २७७ क्विंटल कांद्याची आवक झाली, तसेच १० हजार ४७० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.

Team Agrowon

Ahilyanagar News : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीस गत आर्थिक वर्षात चार कोटी २६ लाख ४० हजार ८७४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता बाजार समितीस या आर्थिक वर्षात दोन कोटी आठ लाख ९२ हजार ४१५ रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती सभापती किसनराव रासकर व माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली.

खासदार नीलेश लंके यांच्या गटाच्या ताब्यात बाजार समितीची सत्ता आल्यानंतर खासदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हित जोपासत आम्ही पारदर्शक कारभार सुरू केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात बाजार समिती आवारात पंधरा लाख ३० हजार २७७ क्विंटल कांद्याची आवक झाली, तसेच १० हजार ४७० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.

गत आर्थिक वर्षात बाजार समितीची सुमारे ४२६ कोटींची उलाढाल झालेली आहे. काटकसरीने कारभार करत कर्मचाऱ्यांचे वेतन व आस्थापनेवरील खर्च वजा जाता बाजार समितीस सुमारे दोन कोटी आठ लाख ९२ हजार ४१५ रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा झाला असल्याचेही रासकर व तरटे यांनी सांगितले.

बाजार समितीने नफ्याची रक्कम खात्यावर शिल्लक न ठेवता संचालक मंडाळाच्या ठरावानुसार ती रक्कम बँकेत कायम ठेव म्हणून जमा केली आहे. सध्या बाजार समितीची कायम ठेव तीन कोटी नऊ लाख ६० हजार रुपये असल्याचेही ते म्हणाले. बाजार समितीत २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे ११ लाख ९० हजार, तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात १७ लाख १४ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणला.

खासगी व्यापाऱ्यांना कांदा विक्री केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची, तर कधी कधी पैसे बुडण्याची शक्यताही नाकारता येत नाही, तसेच जर सरकारने अनुदान देण्याचे ठरविले, तर बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्यालाच अनुदान मिळते. म्हणून शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीतच विक्रीसाठी आणावा, असे आवाहनही सभापती रासकर यांनी केले.

महानगर बँक ते बाजार समिती या दरम्यानचा रस्ता खराब झाला होता. तो दुरुस्तीसाठी खासदार नीलेश लंके यांनी ७५ लाख रुपयांचा निधी दिला होता. त्या निधीतून हा रस्ता तयार झाला आहे.
- किसनराव सुपेकर, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर
आगामी काळात लवकरच शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यानंतर त्यांच्या कांद्याचे वजन त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविले जाणार आहे.
- सुरेश आढाव, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT