Pune APMC
Pune APMCAgrowon

Maharashtra APMC Reclassification: राज्यातील ३०५ बाजार समित्यांचे सुधारित वर्गीकरण

Star Rating of APMCs: महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या उत्पन्नानुसार नवे वर्गीकरण राज्य शासनाने निश्चित केले आहे. यामध्ये पहिल्यांदाच 'अ' वर्गात पंचतारांकित प्रणाली लागू करण्यात आली असून मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि लातूर या बाजार समित्या पंचतारांकित ठरल्या आहेत.
Published on

Nashik News: राज्यात ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्या असून या समित्यांचे ६२५ उपबाजार आवर कार्यरत आहेत. राज्य शासनाने बाजार समित्यांच्या उत्पन्नानुसार वर्गीकरण केले आहे. ज्यात यापूर्वी ‘अ’,‘ब’,‘क’ व ‘ड’ असे चार वर्ग होते. यावर्षी चार वर्गांसह ‘अ’ वर्गात १ ते ५ तारांकित असे उपवर्गीकरण केले आहे. राज्यातील सर्वांत कमी ५ बाजार समित्या ‘अ’ वर्ग पंचतारांकित म्हणून निवडल्या गेल्या आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, लातूर यांचा समावेश आहे.

तर ‘अ’ वर्गमध्ये एक तारांकित बाजार समित्यांमध्ये राज्यातील सर्वांत जास्त ९१ बाजार समित्या आहेत.शासनाच्या ३ एप्रिल २००१ पत्रांनुसार बाजार समित्यांचे यापूर्वी ‘अ’,‘ब’,‘क’ व ‘ड’ या चार वर्गांत वर्गीकरण करण्यात येत होते. त्यामध्ये ‘अ’ वर्गामध्ये १ कोटींपेक्षा जास्त,‘ब’ वर्गामध्ये ५० लाख ते १ कोटी,‘क’ वर्गात २५ ते ५० लाख व ‘ड’मध्ये २५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे.

Pune APMC
Pune APMC: पुणे बाजार समितीत चार दिवसांतच ठेका बदलाची गतिमान प्रक्रिया

२०२३-२४ अखेर राज्यातील ‘अ’ वर्गामध्ये १९४, ‘ब’ मध्ये ५४, ‘क’ मध्ये २७ व ‘ड’ मध्ये ३० बाजार समित्यांचा समावेश आहे. बाजार समित्यांचे आस्थापना खर्च मर्यादेबाबत शासनाने २८ ऑगस्ट २०१४ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार ‘अ’ वर्ग बाजार समिती आस्थापना खर्च मर्यादा ४५ टक्के, ‘ब’ वर्ग बाजार समिती आस्थापना खर्च मर्यादा ५० टक्के, ‘क’ व ‘ड’ वर्गीय बाजार समिती आस्थापना खर्चामध्ये १० टक्के वाढ करण्याबाबत पणन मंडळ यांनी बाजार समित्यांची आर्थिक परिस्थिती तपासून निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे.

पणन विभागामार्फत पुढील १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात राज्यातील सध्याच्या १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे १ ते २.५ कोटी, २.५ ते ५ कोटी, ५ ते १० कोटी, १० ते २५ कोटी व २५ कोटींपेक्षा जास्त असे उपवर्गीकरण हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला होता. त्यानुसार पणन संचालकांच्या २७ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्रानुसार ‘अ’ वर्गीय कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे उपवर्गीकरणासह ‘ब’,‘क’ व ‘ड’ बाजार समित्यांच्या वर्गीकरणाबाबत प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्या अनुषंगाने ‘अ’वर्गीय कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे उपवर्गीकरण तसेच ‘ब’,‘क’ व ‘ड’ बाजार समित्यांचे वर्गीकरणाच्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. पणन संचालकांच्या शिफारशीनुसार राज्यातील बाजार समितीचे वर्गीकरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Pune APMC
Nashik APMC : नाशिक बाजार समितीकडून सुरक्षारक्षकांच्या अनावश्यक खर्चाला कात्री

...असे आहे वर्गीकरण

वर्गवारी...उत्पन्न मर्यादा...बाजार समिती संख्या

अ (पंच तारांकित)...२५ कोटींपेक्षा जास्त...५

अ (चार तारांकित)...१० ते २५ कोटी...१५

अ (तीन तारांकित)...५ ते १० कोटी...२३

अ (दोन तारांकित)...२.५ ते ५ कोटी...६०

अ (एक तारांकित)...१ ते २.५ कोटी...९१

ब...५० लाख ते १ कोटी...५४

क...२५ ते ५० लाख...२७

ड...२५ लाखांपेक्षा कमी...३०

‘अ’ वर्ग पंचतारांकित बाजार समित्या : मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, लातूर

‘अ’ वर्ग चार तारांकित बाजार समिती

हिंगणघाट(वर्धा), पिंपळगाव बसवंत (नाशिक), कोल्हापूर, अमरावती, खामगाव (बुलडाणा), लासलगाव (नाशिक), अहिल्यानगर, सांगली, जालना, जुन्नर (पुणे), कल्याण (ठाणे), अकोला, भिवंडी (ठाणे), बार्शी (सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com